31 मार्चपूर्वी जर तुम्ही आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक करू शकला नाहीत तर तुम्हांला दोन गोष्टींचा सामना करावा करणार आहे. एक म्हणजे तुमचे पॅन कार्ड इन अॅक्टिव्ह होणार आहे आणि दुसरे म्हणजे तुम्हाला 10,000 रूपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. 13 फेब्रुवारी 2020 रोजी सीबीडीटीने काढलेल्या अध्यादेशामध्ये जर 31 मार्चपूर्वी पॅन कार्ड आधार कार्डासोबत लिंक केलेले नसेल तर 1 एप्रिल पासून ते इनअॅक्टिव्ह होणार आहे. याबाबत आयकर विभागाकडून नुकताच एक अध्यादेश जारी करण्यात आला आहे.
दरम्यान एखादी व्यक्ती नव्या नोटिफिकेशननुसार इन्व्हॅलिड पॅन कार्ड वापरताना आढळल्यास आयकर कायद्याच्या कलम 272बी अंतर्गत संबंधित व्यक्तीला 10,000 रूपयांपर्यतचा दंड आकारला जाऊ शकतो. तुमचे पॅनकार्ड इनअॅक्टिव्ह असेल तर बॅंकिंग व्यवहारापासून, प्रॉपर्टी विकत घेणे, विकणे अशा आर्थिक व्यवहारामध्ये, स्टॉक आणि म्युचअल फंडच्या गुंतवणूकीमध्येही अडथळे येऊ शकतात. दरम्यान कार्यान्वित नसलेले पॅनकार्ड देखील तुमच्याकडे पॅनकार्ड नसल्यासारखेच आहेत. तुम्ही आधारकार्डासोबत पॅनकार्ड लिंक केल्यानंतर ते पुन्हा अॅक्टिव्ह होऊ शकते.
केंद्र सरकारने याअगोदर पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक करण्यासाठी पुरेशी मुदतवाढ दिली आहे. पण अद्यापही देशातील सुमारे 17 कोटीहून अधिक नागरिकांनी आपले पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक न केल्यामुळे अशा लोकांसाठी 31 मार्च 2020 ही अंतिम मुदत असेल.
टिप्पणी पोस्ट करा