आतापर्यंत कोरोना व्हायरस (Coronavirus) या भयंकर विषाणूचा संसर्ग 80 देशांमध्ये पोहचला असून भारतातही या विषाणूचा धोका जाणवू लागला आहे. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 31वर पोहचली आहे. यातील तीन रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले असल्याचे समजते.
दुसरीकडे देशातील कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारने पूर्णपणे तयारी केली आहे, असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केला आहे. आरोग्यमंत्री हर्षवर्धन स्वत: गुरुवारी रात्री दिल्ली विमानतळावर पोहोचले. त्याच वेळी त्यांनी स्क्रीनिंगसह सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला.
सध्या भारतात कोरोनामुळे त्रस्त रूग्णांची संख्या 31 आहे. गुरुग्राममध्ये 31 पैकी 15 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, दिल्ली रुग्णालयात 10 रुग्ण दाखल आहेत, एक रुग्ण तेलंगणात आहे, तर २ रुग्ण जयपूरमध्ये आहेत. या 31 रूग्णांपैकी 16 रुग्ण इटलीचे रहिवासी आहेत जे भारतात फिरायला भेटायला आले होते. तर, 6550 फ्लाइटमधून आतापर्यंत 6,49,452 प्रवाश्यांची तपासणी करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा संशय असलेल्या लोकांच्या चौकशीसाठी सरकारने यापूर्वीच 15 प्रयोगशाळेची स्थापना केली आहे आणि आता 19 आणखी प्रयोगशाळेची तयारी सुरू केली आहे. परदेशातून येणार्या प्रत्येक प्रवाशाची देशातील 21 विमानतळांवर चौकशी केली जात आहे.
आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असलेल्या गोव्यातही पर्यटकांची संख्या आता रोडावू लागली आहे. या कमी होणाऱ्या पर्यटकांच्या संख्येचा परिणाम इथल्या स्थानिक व्यवसायिकांवर होताना दिसत आहे.देशात दिल्ली जयपूर पाठोपाठ अन्य ठिकाणीही कोरोना व्हायरसचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. गोवा आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्याने इथं परदेशी पर्यटकांची ये जा ही मोठी असते. त्यामुळे गोव्यात सुरुवातीपासून कोरोना व्हायरसची भीती दिसून येत आहे.
दिल्लीतील पाचवीपर्यंतची सर्व शाळा 31 मार्चपर्यंत बंद आहेत. गाझियाबादमध्येही अनेक शाळांमध्ये सध्याच्या सत्रासाठी पाचवीपर्यंतच्या वर्गवारी जाहीर करण्यात आल्या आहेत. जम्मू, बिहार, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोरोनाचे संशयित सापडले आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युरोपियन देशांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे करण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा