जालना : जालनामध्ये एका स्टील कंपनीमध्ये मोठी दुर्दवी घटना घडली आहे. लोखंड वितळण्याच्या भट्टीत स्फोट होऊन तापलेले मेटल उडाल्याने चार मजुरांचा मृत्यू झालाय तर आठजण
8 गंभीर जखमी झालेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना औरंगबादच्या खाजगी दवाखाण्यात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.
औद्योगिक वसाहतीमधील ओम स्टील कारखान्यात नेहमीप्रमाणे काम सुरू असताना दुपारी चारच्या सुमारास लोखंड वितळण्याच्या भट्टीत अचानक स्फोट होऊन ही दुर्घटना घडली. स्फोट झाला तेव्हा ३५ ते ४० कामगार भट्टीजवळ काम करत होते. या अपघातात भट्टीमधील तापलेले मेटल अंगावर उडाल्याने ही दुर्घटना घडली आहे.

ओम साई राम स्टील कंपनीत बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळ्या तयार केल्या जातात.
दुपारी चारच्या सुमारास सळ्या करण्यासाठी वितळवण्यात आलेलं लोखंड भट्टीमधून बकेटमध्ये ओतल्यानंतर ते उतू गेले. त्यामुळे भट्टीतले तप्त लोखंड वितळले. हे वितळलेले लोखंड जवळ काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर पडले. यात 4 कामगारांचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर या घटनेत इतर 8 कामगार जखमी झाले. जखमींपैकी 3 गंभीर कामगारांवर औरंगाबाद तर उर्वरित 5 कामगारांवर जालना येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.दुर्घटनेतील मृत व जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत कळू शकली नाही.
दरम्यान, घटनेतील मृतांची संख्या वाढण्याचा अंदाज असून या घटनेमुळे पुन्हा कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा