5G  मध्ये  नेमकं आहे तरी काय ?  जाणून घ्या इत्यंभूत  माहिती...

इंटरनेटच्या जगात खरी क्रांती घडली ती 4G च्या आगमनानंतर. 4G इंटरनेट मुळे आपल्याला वेगाने इंटरनेट उपलब्ध झाले पण आणखी चांगल्या पद्धतीने व वेगाने इंटरनेट आले आहे ते म्हणजे 5G म्हणजेच इंटरनेटची 5 वी पिढी आता हजर झाली आहे, त्यामुळे इंटरनेटचे विश्र्व आता खर्या अर्थाने सुपरफास्ट होणार आहे. मागील वर्षीच दक्षिण कोरिया, अमेरिका, चीन तसेच काही युरोपीय देशांनी व्यावसायिक तत्वावर 5G ची सुविधा देणे सुरु केले. आता भारतासहित अनेक देशांत 2020 सालाच्या अखेरपर्यंत मेनस्ट्रीममध्ये घेण्यात येणार आहे. 5G चे अनोखे वैशिष्ट असे की 4G पेक्षा 10 पटीने अधिके वेगाने डेटा ट्रांसफर करणार आहे. म्हणजेच आता तुम्हाला तुमची फेवरेट मूवी डाउनलोड  करायला पूर्वी 25 – 30 मिनीटे लागायची ते काम आता अवघ्या काही सेकंदभरात होऊ शकणार आहे.

5G  मुळे अल्ट्रा एचडी क्वालिटीचे वीडियो कॉलिंग करायचा आनंद अनुभवायला मिळणार आहे स्मार्ट डिवाइसेजना स्ट्रांग कनेक्टिविटी मिळेल यामुळे आपलेही आयुष्य त्याच वेगाने सर्वार्थाने बदलेल.
5G म्हणजेच पांचवी जनरेशन नेटवर्क टेक्नोलॉजी केवळ उत्तम कनेक्टिविटी प्रदान करेल याशिवाय ते आपले जीवन अधिकच रोमांचकारी आणि अद्भूत होऊन जाणार आहे याची कल्पनादेखील तुम्ही करु शकत नाही.

5G नेटवर्क मुख्य: चार प्रकारच्या फ्रिक्वेंसीवर काम करेल ती म्हणजे Non-standalone 5G (NSA-5G), standalone 5G (SA-5G), Sub-6 GHz आणि mmWave. कुठल्याही परिस्थिती या चार स्पेक्ट्रम च्या माध्यमाद्वारे ही 5G नेटवर्क ची सुविधा यूजर्स पोहोचवली जाईल. ज्यामध्ये 4G LTE साठीच्या उपलब्ध इंफ्रास्ट्रक्चर चा वापर करत 5G नेटवर्क डिप्लॉय केल जाईल . नेटवर्क च्या टेस्टिंग साठी टेलिकॉम कंपनियां याच स्पेक्ट्रमचा वापर करतात. 5जी नावावरुन स्पष्ट होते की जुन्या 4G LTE नेटवर्क वर अवलंबून न रहाता स्वत:च्या क्लाउड नेटिव नेटवर्क कोर वर काम करते. जगातील अनेक देशांनी हेच स्पेक्ट्रम अडोप्ट केलेले आहे.


Sub-6 GHz

ह्याला मिड बैंड 5G स्पेक्ट्रम असे म्हंटले जाते ज्यात नेटवर्क फ्रिक्वेंसी 6GHz हून कमी असते व वापर लो बैंड टेलिकम्युनिकेशन्स साठी करतात. सध्या चीनसहित अनेक देश या स्पेक्ट्रमचा वापर करतात.

mmWave

ह्याला हाई बैंड 5G नेटवर्क फ्रिक्वेंसी असे म्हंटले जाते. यात 24GHz हून जास्त फ्रिक्वेंसीचा वापर केला जातो, ज्यात अधिक बैंडविथ मिळते व स्पीड 1Gbps एवढा स्पीड मिळतो. लोअर रेंज चे सेलफोन टॉवर mmWave ला डिप्लॉय करण्यास वापरले जातात.

डायनैमिक नेटवर्क शेयरिंग

4G चे 5G नेटवर्कमध्ये अपग्रेड करण्यासाठी  टेलिकॉम कंपनयां डायनैमिक नेटवर्क शेयरिंग करतात. हे तंत्रज्ञान NSA 5G स्पेक्ट्रम सोबतच करावे लागते, ज्याने 5G नेटवर्क एकाचवेळी दो रेडियो फ्रिक्वेंसीचा वापर करू शकते. असे केल्याने टा स्पीड वाढेल आणि 4G LTE च्या तुलनेत डिवाइस वेगाने नेटवर्क एक्सेस करू शकेल. sub-6 GHz फ्रिक्वेंसी चा असा एक फायदा आहे की ती कुठल्याही  सॉलिड ऑब्जेक्ट जसे की बिल्डिंग वगेरेच्या आरपार जाऊन 5G नेटवर्क कनेक्टिविटी सुरू ठेवण्याचे काम करणार आहे, ज्याने अगदी घरांत ओफिसात बसून विना अडथळा आपल्या  नेटवर्क कनेक्टिविटी मिळत राहिल.

भारतात ह्यावर्षीपासूनच टेलिकॉम कंपनिय्यांनी नेटवर्क इंफ्रास्ट्रक्चर तयार करण्याचे काम हाती घेतलेले आहे ज्यात Reliance Jio आणि Airtel कंपन्या अग्रगण्य आहेत, त्यांनी आपल्या नेटवर्क ला Non Standalone 5G साठी तयार केलेले आहे. त्यामुळे या कंपन्या डायनैमिक शेयरिंग चा वापर करत यूजर्सना 4G LTE सह 5G नेटवर्क उपलब्ध करून देणार आहे म्हणजेच आता यूजर्सना दो रेडियो फ्रिक्वेंसी सहित नेटवर्क कनेक्टिविटी मिळणे सुरू होणार आहे व आयष्य अधिक सुखकर होऊ शकणार आहे.  
  
- बोरूबहाद्दर डेक्स
 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने