नवी दिल्ली - दैनंदिन कामात वापरल्या जाणार्या कागदामध्ये आतापासून पर्यावरणाचे रक्षण व एकसारखेपणा आणण्यासाठी १ एप्रिलपासून सर्वोच्च न्यायालयाने एक नवीन निर्णय घेतलाय. दोन्ही बाजूंनी छापलेल्या ए4 साइज/ आकाराच्या कागदावर याचिका आणि प्रतिज्ञापत्रे स्वीकारण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्यात आला आहे.
मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी 14 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयीन रेजिस्ट्रीचे निर्देश दिले होते की, सर्व बाजूंनी अंतर्गत संप्रेषणासाठी दोन्ही बाजूंनी मुद्रित केवळ ए 4 आकाराचे कागदच वापरावेत.यासंदर्भात गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर पाच मार्चचे परिपत्रक अपलोड करण्यात आले आहे. आता अॅडव्होकेट ऑन रेकॉर्डला सर्व संदेश केवळ ई-मेल आणि एसएमएसद्वारे पाठविले जातील. कागदावर छापलेली अशी माहिती पाठविण्याची प्रवृत्ती रेजिस्ट्री संपवित आहे. हेदेखील सदर परिपत्रकात म्हंटले आहे. यापूर्वी, २ जानेवारीपासून प्रभावित करण्यात आलेल्या परिपत्रकात प्रत्येकाला कागदाच्या वापरासाठी काटकसरीने राहण्याची विनंती केली गेली होती.
या परिपत्रकात असे म्हटले आहे की, सर्व संघटनांच्या माहितीसाठी हे सूचित केले आहे की, कागदाच्या वापरात आणि छपाईत एकरूपता आणण्यासाठी आणि कागदाचा वापर कमी करण्यासाठी व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी फक्त ए 4 आकाराचा सर्वोत्कृष्ट कागद वापरला जाईल. सक्षम प्राधिकरण ही सूचना देऊन आनंदित होत आहे.
हे परिपत्रक अॅपेक्स कोर्टाचे सरचिटणीस संजीव एस. काळगावकर यांच्यामार्फत देण्यात आले आहे. त असेही म्हटले आहे की आता अॅडव्होकेट ऑन रेकॉर्डला सर्व संदेश ई-मेल व एसएमएसद्वारे पाठविले जातील आणि कागदपत्रांवर छापलेली माहिती पाठविण्याची प्रॅक्टिस रजिस्ट्री संपवित आहे.

टिप्पणी पोस्ट करा