येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर ईडीने नुकताचा छापा टाकल्याची बातमी आहे. काही वित्त तंत्रज्ञान कंपन्यांना दिलेली कर्ज थकीत झाली आणि त्याचवेळी यासाठी परदेशातील पैसा कपूर यांनी वापरल्याचा संशय आहे. गैंगस्टर इकबाल मिर्ची शी संबंध असल्याकारणाने तसेच मनी लाँड्रींग कायद्यांतर्गत ईडीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पूर्व सीईओ राणा कपूर यांच्या वरळीतील समुद्र महल नावाच्या घरी शुक्रवारी रात्री ईडीने धाड टाकली. ईडी अधिकार्यांकडून येस बैंकेद्वारा डीएचएफएलला कर्ज देण्याच्या संबंधित राणा कपूर यांची चौकशी सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून डीएचएफएलचे नाव घेतल्यानंतरच कपूर यांच्या घरावर धाड टाकण्यात आली.
येस बैंक औगस्ट, 2018 पासून संकटात होती. त्यावेळी रिजर्व बैंकेने येसबैंकेच्या व्यवहार व कर्जांसंबंधित असलेल्या त्रुटींमुळे तत्कालिन प्रमुख राणा कपूर यांना 31 जनवरी, 2019 पर्यंत पदावरून हटण्यांस सूचित केलेले होते. उत्तराधिकारी रवनीत गिल यांच्या नेतृत्वामध्ये बैंकनी आपात्कालिक कर्जाबाबत जाहिरात दिली होती. त्यानंतर मार्च, 2019 च्या तिमाहीला पहिल्यांदा येस बैंकेला भरपूर तोटा सहन करावा लागला.
दरम्यान, राणा कपूर यांच्याविरोधात ईडीकडून लूक आऊट नोटीसही बजावण्यात आली आहे. त्यामुळे कपूर यांना देश सोडून अजिबात जाता येणार नाही. राणा कपूर यांच्यावर वारेमाप कर्जवाटप केल्याचा आरोप आहे.
टिप्पणी पोस्ट करा