कोरोनामुळे पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त !

नवी दिल्ली - चीनमधील कोरोना विषाणूचा जगभरात फैलाव होत असताना कच्च्या तेलाच्या किमतीतही घट झालेली दिसते आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून  पेट्रोल-डिझेलच्या किमतीतसुद्धा कपात झाली आहे. मेट्रो सिटींमध्ये जसे की मुंबईदिल्लीचेन्नई तसेच कोलकाता अशा शहरांत पेट्रोल-डिझेलचे दर कमी झालेले आढळले आहेत. त्यामुळे एकीकडे कोरोनाच्या दहशतीचं सावट असलं तरी वाहनचालकांना किंचितसा दिलासा मिळू शकणार आहे.

दिल्ली मध्ये डीजचा दर 2.33 रुपयाने तर पेट्रोलच्या दरात 2.69 रुपयांने कमी झालेला आहे.  त्यामुळे आता दिल्ली शहरात पेट्रोल 70.29 रुपये आणि डीजल 63.01 रुपये प्रति लीटर  या दराने मिळू लागलेले आहे.   

पेट्रोलच्या किंमती शहरानुसार 
  • दिल्ली   70.29 रुपये प्रति लीटर
  • मुंबई   75.99 रुपये प्रति लीटर
  • कोलकाता   72.98  रुपये प्रति लीटर
  • चेन्नई    73.02  रुपये प्रति लीटर
  • नोएडा   72.58 रुपये प्रति लीटर
  • गाजियाबाद  72.45 रुपये प्रति लीटर

डीजल च्या किंमती शहरानुसार

  • दिल्ली   63.01  रुपये प्रति लीटर
  • मुंबई   65.97  रुपये प्रति लीटर
  • कोलकाता   65.34  रुपये प्रति लीटर
  • चेन्नई   66.48  रुपये प्रति लीटर 



सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घसरण


 यापूर्वीच तेल विपणन कंपन्यांनी दिल्लीकोलकातामुंबई और चेन्नई या शहरांत अनुक्रमे मंगवार, बुधवारी पेट्रोल दरात कपात केलेली होती. इंडियन ऑयल कंपनीच्या वेबसाइट वर दाखवल्याप्रमाणे मंगलवारी दिल्लीत पेट्रोल 1.15 रुपये तर  डीजल 1.02 रुपये  अशा दराने विकले जात होते.

आणखी एक महत्तवाची गोष्ट अशी की  अंतरराष्ट्रीय बाजाराच्या परिणामामुळे 16 जून, 2019 पासूनच पेट्रोल आणि डीजेच्या कीमतीत  दिवशी बदल होताना दिसतायत. आणि पेट्रोलडीजच्या दरातील बदल दर दिवशी सकाळी सहा वाजता कळतो. त्यामुळे देशभरातील सगळेच पेट्रोल पंपांवर सकाळीच सहा वाजता दराबाबत माहिती दिली जाते.

चीनसहित दुनियाभरातील 80 हून अधिक देशात पसरलेल्या कोरोना वायरसच्या संक्रमणामुळे पेट्रोल आणि डीजेच्या किंमतीत सततचीच घसरण पहायला मिळते आहे.  आणि अजून पुढील काही दिवस दरांमध्ये घसरण पहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे.

पेट्रोल पदार्थाचा अभ्यास करणाऱ्य़ा विशेषज्ञाच्या अनुसार, कोरोना वायरसचा जगावर होणारा प्रभाव हा सहजासहजी कमी होणार नाही. त्यामुळे कच्या तेलाच्या किंमतीत अजून काही महिने वाढ होण्याची चिन्हे अजिबात दिसत नाहीत. आणि याचा सर्वाधिक फायदा आपल्या देशाला होणार आहे याचे कारण म्हणजे भारत हा सर्वात जास्त कच्चे तेल आयात  करणारा देश म्हणून ओळखला जातो. परिणामी देशातील जनतेला याचा नक्कीच चांगला फायदा होणार असल्याचे समजते. 


पेट्रोलियम पदार्थ मार्केटचा अभ्यास करणाऱअया जाणकारांच्या माहितीनुसार मागील तीन दशकांतील आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील एवढी मोठी ही घसरण प्रथमच झालेली आहे.याआधीच्या 90 च्या दशकातील खाड़ी युद्धादरम्यानही एवढी घसरण पहायला मिळालेली नव्हती.आठवड्याच्या सुरूवातीला मार्केट सुरू होतानाच कच्च्या तेलाच्या दरात 30 टक्काने घसरण झालेली आढळली होती.विशेषज्ञांच्या माहितीनुसार, आखाती देश आणि रशिया यांच्यात तेलाच्या किंमतीवरुन सुरु असलेल्या वादामुळे ही घसरण झाली आहे.  


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने