पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया सोडून देण्याचा विचार करत असल्याचं ट्विट केलं. त्यानंतर सगळीकडं मोदींच्या या निर्णयाची सगळीकडे चर्चा सुरू झाली. यावर मीम्सही व्हायरल होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदींच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
‘मी सोशल मीडिया सोडू इच्छितो’ अशा प्रकारचं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यानाच धक्का दिला. ‘येत्या रविवारपासून मी सोशल मीडिया सोडू इच्छितो. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्युब येथील सगळ्या अकाऊंट्समधून बाहेर पडून ही अकाऊंट्स बंद करु इच्छितो,’ असं मोदी म्हणाले. याबाबत येत्या रविवारी मी माझी भूमिका स्पष्ट करेन असंही मोदींनी म्हटलं होतं. कदाचित भारतात आणखी काही नवीन सोशल मिडीयाचा प्रकार आणणार असल्याची चर्चा केली जात आहे.
विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनीही सोशल मीडिया सोडणायाची ग्वाही दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट रिट्विट करून अमृता फडणवीस यांनी स्वतःचं म्हणणं मांडलं आहे. ‘कधी कधी लहानसे निर्णय आपलं आयुष्य कायमचं बदलू शकतात. मी माझ्या नेत्याच्या पावलावर पाऊल ठेवणार आहे,’ असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं.
टिप्पणी पोस्ट करा