नवी दिल्ली - कोरोनाच्या दहशतीचे सावट आता अंत्यसंस्कारातही दिसू लागले आहे. दिल्लीतील डॉ राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे त्रस्त असलेल्या 68 वर्षीय महिलेच्या निधनानंतर शनिवारी निगम बोध घाट येथे अंत्यसंस्कारावरून वाद झाला.
कोरोना पीडितासाठी कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात झालेल्या गोंधळामुळे 2 तास प्रतीक्षा करुन अंत्यसंस्कार करण्यात आले. हा घटनाक्रम लक्षात घेत, केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह हाताळण्यासाठी एक मार्गदर्शक सूचना तयार करीत आहे.
दिल्लीतील महिलेच्या अंत्यसंस्कारादरम्यानच्या वादानंतर सरकारने पावले उचलली. आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रेत हाताळताना कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता कमी आहे, परंतु मृतांकडून कोरोनाचा फैलाव होण्याबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी आम्ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करत आहोत. कोरोनाचा संसर्ग हा एक श्वसनासंबंधित रोग आहे व तो थेंबांमधून पसरत जातो. मृतदेह हाताळणारे कामगार किंवा स्मशानभूमीतील कामगार यांना मृतदेहापासून कोरोनाची लागण होण्याची शक्यता फारशी नसते.
काय होता वाद
अंत्यसंस्कारासाठी पूर्ण सुरक्षा बंदोबस्त ठेवून हे पथक मृतदेह घेऊन निगम बोध घाटावर पोहोचले खरे परंतु मृताच्या कुटुंबाला सुमारे दोन तास थांबावे लागले. सीएनजीने अंत्यसंस्कार केल्यास हा कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो असे तेथे उपस्थित लोकांचे म्हणणे होते. खबरदारीचा उपाय करत निगम बोधघाटाच्या संचलन समितीने मृतदेहाच्या अंत्यसंस्कारांसाठी लोधी रोडवरील विद्युत स्मशानभूमी घाटात नेण्यास सांगितले.
नंतर जेव्हा हा वाद वाढला, तेव्हा आरोग्य विभागाने हस्तक्षेप केला आणि अंत्यसंस्कार तातडीने करण्याचे निर्देश स्मशानभूमी प्रशासनाला दिले तसेच त्यावेळी पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले, नंतर सीएनजीवर अंतिम संस्कार पूर्ण करण्यात आले.
जागतिक आरोग्य संघटनेकडून सूचना
संसर्ग प्रतिबंध,महामारीचे नियंत्रण, आरोग्य सेवेमध्ये, महामारीमुळे होणारे तीव्र श्वसन संक्रमण बाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये मृतदेहाला आइसोलेशन रूम किंवा कुठून कुठे नेण्यादरम्यान शवाचा द्रवपदार्थांशी थेट संपर्क टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांचा योग्य वापर करण्याचे सुचविलेले आहे.
प्रेताला अभेद्य पिशवीत पूर्णपणे बंद करण्याची शिफारस
प्रेताची देखरेख आणि शवविच्छेदनासाठी स्मशानांत तपासणीसाठी तीव्र श्वसन संसर्गामुळे मेलेल्या माणसांच्या प्रेताला द्रवपदार्थांशी थेट संपर्क टाळण्यासाठी अभेद्य पिशवीत पूर्णपणे बंद करण्याची शिफारस केलेली आहे. प्रेताला हाताळणाऱ्यांना लांब बाह्यांचे गाऊन देण्यात यावे जे गाऊन नष्ट करता येतील तसेच बाह्य प्रेताच्या बाह्यभागावर द्रव, मळ किंवा कोणतेही स्त्राव दिसून येत असेल तर गाऊन जलरोधक असावा असा डब्ल्यूएचओ सल्ला देते.
अंत्यसंस्कार करणाऱ्या कामगारांनी खबरदारी घ्यावी
अंत्यसंस्कार करणाऱ्या कामगारांनी हात व्यवस्थित स्वच्छ ठेवण्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी तसेच योग्य वैयक्तिक संरक्षक उपकरणे वापरली पाहिजेत. जर प्रेतातून द्रव किंवा स्राव होण्याची शक्यता असेल तर कर्मचाऱ्यांनी चेहऱ्याची संरक्षणसाधने देखील वापरणे गरजेचे ठरेल असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा