कोरोना व्हायरस : शंका, प्रश्न आणि त्याची उत्तरे ...

कोरोना व्हायरस  पासून बचाव करण्यासोबतच आता कोरोनासंबंधित असणारे विविध प्रश्न तसेच पसरणाऱ्या अफवा किंवा खोटी माहिती यांपासून दूर रहायला हवे. आणि कोरोना या व्हायरस संबंधित  खरोखरच्या गोष्टी काय आहेत हे जाणून घेणे हे गरजेचे ठरेल. जेणेकरुन कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवून आपण फसवले जाणार नाही. जगातील विख्यात विशेषज्ञांनी कोरोनाबाबतील सत्यता स्पष्ट केली आहे. त्यावर आपण नजर टाकू शकतो.

कोरोना  व्हायरस   अधिक धोकादायक असू शकतो का ?
प्रत्येक व्हायरस हो वेळेनेरूप बदलत जातोएखाद्या वारसचे खतरनाक असणे हे त्याच्या नैसर्गिक रुपावरच अवलंबून असते. जे व्हायरस शरीरीत खूपच लवकर पसरतात ते शरीर निकामी करण्यात अधिक यशस्वी होतात. असे काही नसते की ज्या वारसाने आपण लगेचच आजारी पडतो तेच सगळ्यात धोकादायक असतात. कधीकधी असे व्हायरस दुबळे होतात किंवा त्याची तीव्रता कमी होऊन ते संक्रमित होण्याचा संभव अत्यंत कमी होतो.

चीनमधील वैज्ञानिकानी वुहान तसेच अन्य शहरातील  रोग्यांना झालेल्या वायरसचे 103 नमुन्यांचे जेनेटीक विश्लेषण केले आहे. त्या निष्कर्षांमधून सर्वसामान्यपणे दोन मुख्य उपभेद आढळलेत. एल आणि एस अशी नामकरणे केली आहेत.तरीही त्यात एस पेक्षा एल अधिक प्रचलित दिसला आहे. सत्तर टक्के नमुने हे पूर्व भागातून आले होते.  व्हायरस एस  ची शाखा पैतृक संस्करणामध्ये आढळली, संशोधकांच्या म्हणण्यानुसार एल अधिक आक्रमक प्रभावशाली वायरस असावा जो शरीरात सहजपणे पसरू शकतो. दरम्यान या सगळ्या संशोधनाची प्रत्यक्षरित्या अजून तुलना केली नाही आहे.

थंडीतील फ्लूतापापेक्षा हा व्हायरस खतरनाक तर नाही ना ?
कोरोना  व्हायरस पासून संक्रमित झालेली व्यक्ती ही बहुतांशी हवमानबदलातील तापाच्या लक्षणांसारखीच आजारपणाची लक्षणे अनुभवते. पण आतापर्यंत झालेल्या मृत्यूचा दर पहाता कोरोनाचे संपूर्ण रुपच अधिक गंभीर असल्याचे जाणवते.
चीनमध्ये अंतरराष्ट्रीय मिशनवर नेतृत्व करणार्या ब्रूस आयलवर्ड याने सांगितले की,  हवामान बदलामुळे होणार्या तापापेक्षा कोरोनामुळे होणारा जीवाला धोका दहापटीने जास्त असतो. अनुमानाने मोसमबदलाने होणाऱ्या फ्लूमुळे दरवर्षी 2.90 – 6.50 लाख लोकांचे मृत्यू घडतात.
केवळ वृद्धांसाठी कोरोना जीवावर बेतू शकतो की लहान बालकांनासुद्धा त्रास होऊ शकतो ?
जी माणसे वयाने खूपच मोठी नाहीत तसेच ज्याचे आरोग्य सामान्यपणे चांगल्या स्थितीत असते अशांना कोरोनापासून धोका होण्याचा संभव कमी असतो. तरीही आजारपणात हवाबदलाने आलेल्या तापात श्वासोच्छश्वासाला अडचण होण्याची शक्यता असते. याशिवाय आरोग्य सेवा अधिकारी जे व्हायरसाने संक्रमित असलेल्या रुग्णांशी प्रत्यक्ष संपर्कात येतात त्यांना कोरोनापासून थोडा धोका असू शकतो.

मास्क उपयोगी पडत नाहीत का ?
चेहऱ्यावर मास्क लावला म्हणजे तुम्ही आजारी पडणारच नाहीत अशी खात्री देऊ शकत नाही. कारण व्हायरस हा मास्कला भेदून छोट्या वायरल कणांच्या माध्यमातून डोळ्याच्या ठिकाणी पोहोचू शकतो. शिवाय शिंक खोकल्यासोबत होणाऱ्या खराब जंतूंचा मास्क घातल्याने प्रसार होऊ शकत नाही व तोच कोरोना व्हायरसचा प्रसार व्हायला अधिक कारण ठरतो. म्हणजेच मास्क कोरोनाच्या संक्रमणापासून रोखू शकते. तसेच मास्क वापरणे हे स्वत:साठी पर्यायाने इतरांसाठीसुद्धा सुरक्षित होऊ शकते म्हणूनच आजारी माणसांची सेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते व आरोग्य अधिकारी मास्कचा वापर करताना दिसतात. आजारी असणार्य्याच्या घरातील सदस्यांनीही मास्क अथवा रुमालाचा वापर करणे इष्ट ठरेल.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने