वैयक्तिक जीवनातून कलाकारांना प्रेरणा मिळते - इरफान खान


मागील दोन वर्षांपासून न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर शी झगडा करत होतो त्यामुळे मी अधिकच संवेदनशील झालो. जेव्हा आयुष्य काही अनुभवांमुळे झपाट्याने बदलते त्यावेळी साहजिकच कलाकाराची पर्सनॅलिटीसुद्धा सहजरित्या बदलून जाते. त्यामुळे कलाकारांना वैयक्तिक जीवनातून प्रेरणा मिळत असते असे प्रसिद्ध सिनेअभिनेता इरफान खानने त्याच्या अपकमिंग फिल्म 'अंग्रेजी मीडियम' च्या  एका प्रमोशनल इंटरव्यूमध्ये बोलताना सांगितले.

संपूर्ण आयुष्यात मी 'अंग्रेजी मीडियम' च्या क्रू मेंबर्स चा ऋणी राहिन कारण सिनेमाएटोग्राफर अनिल मेहतापासून सगळ्या टीमने मला आजारपणात काम करताना खूप संभाळून घेतले.कदाचित यामुळे मी अधिकच संवेदनशील होऊन प्रत्येक छोटी गोष्टसुद्धा लक्ष देऊन व्यवस्थित करू लागलो.   

सिनेमासाठी आम्ही कधी 48 डिग्री तापमानात उद्यपूरला शूटिंग करायचे तर कधी डिग्री तापमानात लंडनला शूट व्हायचे. या अशा विपरित तापमानाच्या परिस्थितीत सुद्धा खूप पॉझिटिव वाइब्स मिळत होती मग ती माझी तब्येत असो वा बाहेरचे वातावरण.

2018 साली न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर  वर उपचारासाठी इरफान अमेरिकेला जात होता. 2017 मध्ये आलेल्या हिंदी मिडियमचा सिक्वेल हा होमी अदजानिया ने दिगद्शित केलेला 'अंग्रेजी मीडियम'  आहे. 13 मार्चला रिलीज होणार्या या चित्रपटात इरफानसह करीना कपूरराधिका मदानदीपक डोबरियालकीकू शारदाडिंपल कपाड़िया व रणवीर शौरी पडद्यावर पहायला मिळतील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने