नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर विरोधक नेहमीच टीका करत आलेत. गेल्या पाच वर्षांमध्ये मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर ४४६.५२ कोटी रूपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर गेल्या पाच वर्षांमध्ये किती खर्च करण्यात आला, याबाबत लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधर यांनी लेखी उत्तराद्वारे माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर गेल्या पाच वर्षांमध्ये किती खर्च करण्यात आला, याबाबत लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधर यांनी लेखी उत्तराद्वारे माहिती दिली.
पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांमध्ये झालेल्या खर्चांमध्ये चार्टर्ड विमानांचा खर्चही सामिल असल्याचं यात सांगण्यात आलं. २०१५-१६ या कालावधीत त्यांच्या परदेश दौऱ्यांवर सर्वाधिक खर्च झाला आहे. या कालावधीत त्यांच्या दौऱ्यांवर १२१.८५ कोटी रूपयांचा खर्च झाल्याची माहिती त्यांनी उत्तराद्वारे दिली आहे. तर २०१६-१७ या कालावधीत पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर ७८.५२ कोटी रूपये खर्च करण्यात आले. २०१७-१८ मध्ये त्यांच्या परदेश दौऱ्यावर ९९.९० कोटी रूपये तर २०१८-१९ मध्ये १००.०२ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला.
२०१९-२० या कालावधीत त्यांच्या दौऱ्यावर ४६.२३ कोटी रूपये खर्च करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतप पहिल्यांदा मालदीव आणि श्रीलंकेचा दौरा केला होता. तर त्यानंतर त्यांचा अमेरिकेचा दौरा चर्चेचा विषय ठरला होता. त्यांनी ह्युस्टनमध्ये हाऊडी मोदी या कार्यक्रमाला संबोधित केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी चार महिन्यात मोदींनी फक्त दोनवेळा परदेश दौऱ्यावर जाऊन आल्यास माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा १० वर्षातील ९३ परदेश दौऱ्यांचा विक्रम मोडीत काढून दुसऱ्या स्थानावर विराजमान होणार आहेत. प्रथम स्थानावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आहेत. त्यांनी १५ वर्षाच्या कार्यकाळात ११३ देशांना भेटी दिल्या होत्या
मोदी यांनी ४ देशांना एक वेळा, १० देशांना २ वेळा यामध्ये ब्रिटन, संयुक्त अरब अमिराती, दक्षिण आफ्रिका, आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे. फ्रान्स आणि जपानला प्रत्येकी तीन वेळा भेट दिली. जर्मनी, नेपाळ, रशिया आणि सिंगापूरला ४ वेळा भेट दिली, तर चीन आणि अमेरिकेला ५ वेळा मोदी यांनी भेट दिली.
टिप्पणी पोस्ट करा