कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ताजमहाल बंद ठेवण्याची आग्राच्या महापौरांची मागणी


कोरोना वायरसचे संक्रमण पहाता  आग्राचे   महापौर नवीन जैन यांनी ताजमहलसह  शहरातील  इतर पर्यटन स्थळे बंद ठेवण्याची मागणी  केली आहे. जोपर्यंत कोरोनाच्या संकआमणावर नियंत्रण मिळवले जाणार नाही तोपर्यंत ताजमहाल बंद ठेवण्यात यावा. कारण ताजमहाल पहाण्यासाठी देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात लोकांची ये - जा सुरू असते.

नुकतेच कोरोना वायरसने संक्रमित सहा जण सापडल्याने आग्रातील पर्यटन स्थळांवर विपरित परिणाम झालेला आहे. आग्र्याला  येण्याचे जनता  टाळत असल्याने हॉटेलची  बुकिंग सुद्धा रद्द् केलेली दिसत आहेत.तसेच महापौरांनी जिल्हाधिकार्यांशी संपर्क साधत आग्र्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यास सांगितलेले आहे.

आरोग्य विभागाने गर्दी करण्याचे टाळण्यास सांगितले असून जिकडे अधिक संख्येने लोक गर्दी करू पहाते अशी ताजमहालसकट सर्व पर्यटन केंद्रे बंद करण्याचे सुचवलेले आहे. चीननिर्मित गुलाल आणि होळीसाठी लागणारे विविध रंग खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. शहरातील पालिवाल पार्क मध्ये होणार्या प्रमुख होळी मिलन समारोह रद्द करण्याची सूचना दिलेली आहे, असे महापौरांनी सांगितले.

आग्र्यातून एकूण सहाजण कोरोना वायरसने संक्रमित आढळले होते ते सर्व दिल्लीस्थित असणार्या कोरोना वायरसाने प्रभावित झालेल्या त्या रूग्णाचेच नातेवाईक असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान या सगळ्यांवर दिल्लीतील एका रूग्णालयात उपचार सुरू असून त्याना आइसोलेशन वार्ड मध्ये ठेवलेले आहे व त्यांच्या तब्येतीत सुधारणा झालेली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने