केंद्रीय औषधी अनुसंधान संस्थान म्हणजेच CDRI च्या शास्त्रज्ञांनी केसिया ऑक्सीडेंटलिस वनस्पती म्हणजेच तरवडापासून हाडे मजबूत राहण्याचे नामी औषध शोधले आहे. जे आयुर्वेदिक शास्त्रात गणले जाते. हे औषध सततचे स्टेरोऍडवर अवलंबून रहाणार्यांना रामबाण उपाय ठरू शकेल आणि तरवडीपासून तयार केलेले औषध घेऊन ऑस्टियोपोरोसिस आजारावर मात करता येऊ शकेल.
दरम्यान तरवडाच्या औषधाचे लायसंन्स हे गुजरातच्या कंपनीकडे दिले आहे, जी लवकरच क्लीनिकल ट्रायल सुरू करेल. तसेच केंद्रीय औषधी अनुसंधान संस्थान याचे पेटंटसुद्धा घेण्याच्या आहे. सध्या जे रूग्ण कार्टिकोस्टेरॉयड मेडिसिन वर पूर्णपणे अवलंबून असतात त्यांच्यासाठी हे तरवडीपासून तयार केलेले औषध संजीवनी ठरू शकेल. आजच्या घडीला अगदी जगभरात कार्टिकोस्टेरॉयडच्या मुळे होणार्या सेकेंडरी ऑस्टियोपोरोसिस आजारावर कुठलाही ठोस उपाय मिळालेला नाही, आणि याच कारणामुळे भारतीय संशोधकांनी तरवडाच्या औषधाचा रामबाण उपाय शोधल्याने हा शोध अत्यंत महत्तवपूर्ण समजला जाऊ शकतो.
आंध्र प्रदेशातील पुत्तूरनिवासी गोपाल राजू हे 100 वर्षांपूर्वी फ्रैक्चर वर तरवडापासूनच उपचार करत होते. तसेच स्थानिक भागात लोकप्रिय असणारे हे तरवडाचे उपयोगी झाड औषध म्हणून वापरले जायचे त्यावरूनच कॉर्टिकोस्टेरॉयड घेणार्या रूग्णांची हाडे कशी मजबूत करता येतील यावर उपाय सुचला एंडोक्राइनोलॉजी विभागाचे डॉ. नैवेद्य चट्टोपाध्याय यांनी सांगितले.
विशेष गोष्ट अशी की CDIR च्या फाइटोफार्मास्यूटिकल मिशन अंतर्गत तरवड औषधाला एलोपेथिक औषधे तयार केली जातात तशाच पद्धतीने सगळ्या चाचण्यांवर पडताळून पाहिलेले आहे. कॉर्टिकोस्टेरॉइड मेडिसिन चा वापर हा ऑटोइम्यून डिसीजेस म्हणजेच त्याअंतर्गत येणारे रिह्युमेटायड आर्थराइटिस, स्क्लेरोसिस, इंफ्लेमेट्री बॉवल सिंड्रोम, अल्सरेटिव कोलाइटिस, सोरायसिस, एग्जिमा, एलर्जी व अस्थमा तसेच काही प्रकारचे कॅंसर यांवर केला जातो. विश्वात कॉर्टिकोस्टेरॉयड घेणार्या रूग्णांत 30 - 50 टक्के फ्रैक्चर असण्याचीच शक्यता असते, असे डॉ. नैवेद्य यांनी सांगितले.
अजूनपर्यंत कॉर्टिकोस्टेरॉइड मेडिसिन घेऊन हाडांवर होणार्या दुष्परिणामांवर कुठलाच तोडगा निघालेला नव्हता. तसेच स्टेरॉयडपासून बचाव करण्यासाठी जे औषध दिले जाते त्याने ऑस्टियोनेक्रोसिस उत्पन्न होतो म्हणजेच हाडांना मजबूत करायला किंवा हाडांवर होणार्या इतर औषधांच्या दुष्परिणामांपासून वाचायला तरवडीचे औषधच कामी येणार आहे. त्यामुळे जगाच्या नजरेतून CDIR च्या संशोधकांनी लावलेला तरवडाच्या औषधाचा शोध खूपच महत्त्वाचा गणला जाणार आहे.
तरवडाबाबत संक्षिप्त माहिती
- तरवडाचें झुडुप उंच असते.
- झुडूप कोठेही साधारण रुक्ष ठिकाणी तणासारखे उगवते.
- राजपुतान्याच्या दक्षिणेकडील मध्यहिंदुस्थान, दक्षिणहिंदुस्थान
- तसेच ब्रह्मदेशाच्या कांहीं भागांतून पुष्कळ उगवते.
- भारतीय बाजारात गावठी सोनामुखी म्हणून ओळखली जाणारी भुई तरवड मिळते.
- या तरवडीचे २५ लक्ष क्विंटल उत्पादन होते
- त्यापैकी ९३·५% तामिळनाडूत होते. आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्येही उत्पादन होते.
- भारतातून हिची परदेशात निर्यात होते.
टिप्पणी पोस्ट करा