आता आंब्याचा सिझन सुरू होईल त्याचप्रमाणे फणसही बाजारात दिसू लागतील. सृष्टीमध्ये निर्माण होणाऱ्या सर्व फळांमध्ये फणस हे फळ आकाराने सर्वात मोठे असते. भारत आणि दक्षिण आशिया हे फणसाचे मूळ स्थान आहे. त्यातही बंगळुरू, गोवा, कोकण या ठिकाणी फणसाची झाडे जास्त आढळतात. जगभरातील नागरिकांना खाद्यसुरक्षा देऊ शकेल असे गुणधर्म फणसात असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. हवाई येथील नॅशनल ट्रॅपिकल बोटॅनिकल गार्डन मध्ये डियान रेगान यांनी १९८० पासून सुरू केलेल्या फणसावरील संशोधनातून ही बाब समोर आली आहे. रेगान यांनी ३४ देशांतील फणसांच्या शेकडो जातींवर संशेाधन केले आहे. २००३ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या ब्रेडफ्रूट इन्स्टिट्यूटबरोबर सध्या त्यांचे संशोधन सुरू आहे.
जगभरात जेथे नागरिकांची उपासमार होत आहे त्याविरूद्ध लढण्यासाठी जगभर फणस लागवडीची योजना या संस्थेना हाती घेतली आहे. अलायन्स टू एंड हंगर या नावाने या संस्थेने हा उपक्रम चालविला आहे. संस्थेचे डॉ.जरेगा यांनी दिलेल्या माहितीनुसार जगभरातील विविध ठिकाणचे पाणी, हवा, वातावरण कोणत्या जातींच्या फणसांना अधिक मानवते याचा शोध घेऊन तशाप्रकारच्या जाती लावल्या जाणार आहेत.३ किलोचा एक फणस पाच जणांच्या कुटुंबाची कर्बोदकांची गरज पुरी करू शकतो असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. फणसाच्या आठळ्यापासून जे पीठ मिळते त्याचा उपयोग अनेक प्रकारच्या मिठाया आणि अन्य पदार्थ करण्यासाठी करता येतो.
फणसात प्रोटीनचे प्रमाणही चांगले आहे. सोयाबीनपेक्षाही अधिक प्रमाणात अमायनो आम्ले फणसात आहेत. तसेच फणसात जीवनसत्त्वे आणि खनिजांचे प्रमाणही चांगले आहे. रोग पडू न शकणारी फणसाची रोपे संस्थेने तयार केली आहेत. या रोपांना दोन वर्षात फळे येतात. अशी ३५ हजार रोपे जगातील २६ देशांत पाठविली गेली असल्याचेही सांगितले जात आहे.
फणसाबाबत संक्षिप्त माहिती
फणस हे अरटिकसी या कुळातील आहे.
बरका व कापा फणस अशा त्याच्या दोन जाती आहेत.
कापा प्रकारात मधुर चविष्ट व कडक गरे आढळतात व हे गरे पिवळ्या रंगाचे असतात तर बरकामध्ये गोड व लिबलिबीत नरम व पांढरे गरे आढळतात.
फणसावर जाड काटे असतात. फणसाचे गरे व आठळे दोन्हीमध्येही औषधी गुणधर्म आहेत.
फणसाचे साधारणपणे वजन २०-२२ किलोपासून ४० किलोपर्यंत असते.
पिकलेला फणस शीतल, स्निग्ध, तृप्तीदायक, मधुर गुणात्मक, मांसवर्धक व बलदायक असतो.
फणसाचे गर व आठळ्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, कॅरोटिन, थायमीन रिबोफ्लेविन, नायसिन व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते
तसेच प्रथिने, मेद, खनिजे, आद्र्रता, तंतुमय, पिष्टमय पदार्थही असतात.
अशा सर्व गुणधर्मामुळे शरीर संवर्धनासाठी, पचनशक्ती वाढविण्यासाठी फणसाचा उपयोग होतो
फणसाचा योग्य वापर कसा कराल
फणसाची बी सुकवून दळून त्याचे पीठ बनवावे व या पिठाचा वापर भाजीत, आमटीत रश्श्यासाठी करावा किंवा त्याची थालिपीठे बनवावीत. हे अत्यंत पौष्टिक असल्याने अशक्तपणा, जुना ताप, कृशव्यक्ती यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आठळीच्या पिठाचा वापर करावा. आठळीच्या पिठापासून खीरही बनविता येते. रुग्णांसाठी खीर बनवून तिचा वापर करावा.
फसणाचे गरे, लहान मुलांच्या शक्तीप्रमाणे खाण्यास द्यावे. त्यांची शारीरिक व मानसिक वाढ चांगली होण्यासाठी याचा उपयोग होतो
फणसाची बी सुकवून दळून त्याचे पीठ बनवावे व या पिठाचा वापर भाजीत, आमटीत रश्श्यासाठी करावा किंवा त्याची थालिपीठे बनवावीत. हे अत्यंत पौष्टिक असल्याने अशक्तपणा, जुना ताप, कृशव्यक्ती यांचे आरोग्य चांगले
फणसांच्या गऱ्याची खीर व कढीही उत्कृष्ट होते. तसेच फणसापासून जाम, जेली, मुरंबा तयार करता येतो. हे सर्व पदार्थ लहान मुलांना आवडतात म्हणून या सर्व पदार्थाचा आहारामध्ये समावेश करावा. कच्च्या फणसाची भाजी बनवावी तसेच आठळ्या ओल्या असताना त्यांची भाजी बनवावी.
फणस हे पौष्टिक असल्याकारणाने ते शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी चांगले आहे, परंतु फार गरे खाल्ल्यास त्यामध्ये असणाऱ्या एन्झाइममध्ये अपचन होऊन जुलाब होतात. म्हणून सहसा फणस जेवण झाल्यावर खाऊ नये. फणसाचे गरे खाल्ल्यानंतर त्यावर नागवेलीचे पान खाल्यास पोट फुगते व खूप त्रास होतो.
टिप्पणी पोस्ट करा