आज सर्वत्र जागतिक महिला दि उत्साहाने साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने देशातील सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. हा दिवस महिलांप्रती सन्मान करण्याचा दिवस आहे, नारीशक्तीची भावना आणि महिलांच्या कर्तृत्वाला आम्ही सलाम करतो, असं म्हणत मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
‘काही दिवसांपूर्वी मी सोशल मीडिया सोडण्याच्या विचारत असल्याचं जाहीर केलं होतं. आज दिवसभर कर्तृत्व गाजवणाऱ्या ७ महिला माझ्या सोशल अकांउंटवरून त्यांचा प्रवास, आणि त्यांनी केलेल्या कामगिरीविषयी सांगणार आहेत तसेच तुमच्याशी संवाद देखील साधणार आहेत.’ असेही पंतप्रधान म्हणाले.
एथलेटिक्समध्ये स्वत:चे कर्तृत्त्व गाजवलेल्या 103 वर्षीय मान कौर यांना राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला.
राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी बिहारच्या बीना देवी यांना नारीशक्ती हा पुरस्कार आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुपूर्त केला. मशरूमची शेती लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे त्याचसाठी हा नारीशक्ती पुरस्कार दिला गेला. बीना देवी ह्या मशरूम महिला याच नावाने जगात ओळखल्या जातात. याचप्रमाणे बीना देवी ह्यांनी टेटिया बंबर ब्लॉकच्या एक प्रमुख पंचायतीच्या सरपंच म्हणून तब्बल पाच वर्षे काम पाहिलेले होते.
राष्ट्रपतींच्या हस्ते विंग कमांडर भावना कंठ यांनाही नारीशक्ती पुरस्कार देण्यात आला आहे. भावना कंठ ह्या भारतीय वायुसेनेच्या अशा फ्लाईंग औफिसरांपैकी एक आहेत की ज्यांनी मिग 21 हे लढाऊ विमान कुणाच्याही मदतीशिवाय एकटीनेच चालवलेले आहे.
टिप्पणी पोस्ट करा