जगभर हाहाकार माजविणाऱ्या कोरोना व्हायरसचा फटका आता पर्यटन क्षेत्राला बसू लागला आहे. पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानावर याचा दूरगामी परिणाम झाला आहे. यामुळेच राजस्थानातील हॉटेलचे ८० टक्के बुकिंग रद्द झाले आहे.
कोरोना व्हायरसचा धसका पर्यटकांनी घेतला असल्याने आंतरराष्ट्रीयच नव्हे तर राष्ट्रीय पर्यटनावरही होताना दिसतोय. कोरोना वायरसचा राजस्थानमधील पर्यटनावरही बराच परिणाम झालाय. 80 टक्यांनी हॉटेल बुकींग रद्द झालेले आहेत. समाचार एजेंसी आइएएनएस च्या अनुसार होटल एसोसिएशन ऑफ राजस्थान चे अध्यक्ष गजेंद्र यांनी सांगितले. राजस्थानमध्ये तीन कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत तर देशात एकूण 73 कोरोनाबाधित असणाऱ्यांची पुष्टि दिलेली आहे ज्यात विदेशी लोकांचाही समावेश असल्याचे केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
दिल्लीत कोरोनाने ग्रस्त असलेले 6 जण, केरळमध्ये सर्वाधिक 17 जण, महाराष्ट्रात 11 जण कोरोनाग्रस्त, उ.प्रदेशात 11, हरियाणात 14 जण कोरोनाने बाधित असल्याचे सांगितले जात आहे. तर 73 कोरोना संक्रमित लोकांमध्ये 56 जण भारतीय व अन्य 17 जण विदेशी असल्याचे समजते.
विदेशमंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितले की ईरान मध्ये 6,000 भारतीय अडकलेले आहेत. त्यातील महाराष्ट्र आणि जम्मू-कश्मीर चे 1100 तीर्थयात्री व 300 विद्यार्थी असल्याचे समजते. तीर्थयात्रींना लवकर मायभूमीत परत आणण्याकडे विशेष भर दिला जात आहे जे अधिककरून क्योम मध्ये अडकून पडलेत. ईराणात अडकलेल्या 529 भारतीयांपैकी 229 कोरोनाने संक्रमित झालेले नाहीत. ईराणमधील नीतीनियम हे जरा अधिकच कडक असल्याने भारतीयांना तिकडून बाहेर पडण्यास अनेक अडचणी येत आहेत.
दरम्यान दिल्ली हाईकोर्टने ईरानमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी संपर्क करायला आणि त्यांना परत आणण्याचे केंद्र सरकारकडून आश्वासन घेतले आहे. तसेच तिकडे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी येण्याबाबत काही नियम केले आहेत का ते पाहून याबाबतचा अहवाल देण्यास सांगितलेले आहे.
बुधवारी उत्तर प्रदेशच्या राजधानीत म्हणजेच लखनऊत कॅनडाहून भारतात आलेली एक महिला डॉक्टर कोरोना वायरसने संक्रमित असल्याचे आढळलेले आहे. आता उत्तप्रदेशातील कोरोनाबाधितांची एकूम संख्या 10 झाली आहे. त्या महिलेला किंग जॉर्ज मेडिकल यूनिवर्सिटी (KGMU) च्या आइसोलेशन वार्डमध्ये भरती केलेले आहे.
कतार देशात कोरोना वायरसचे 238 रुग्ण आढळून आलेत तर संक्रमितांची संख्या 262 अशी आहे, नुकत्याच कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांना क्वॉरेंटाइन केलेले आहे, अशी माहिती स्वास्थ मंत्रालयाने दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने कोरोनावायरस ला वैश्विक महामारी घोषित केलेले आहे भयंकर प्रकारे फोफावणाऱ्या हा वायरस खरोखरीच चिंतेची गोष्ट होऊन बसलाय. कोरोना वायरसचे मूळ असलेल्या चीन देशाबाहर कोरोना वायरस (COVID-19) चे 4,596 रुग्ण आढळले, संक्रमित लोकांची कुलसंख्या 37,371 झालीये तर त्याने मरण पावलेल्यांची संख्या 1,130 अशी झालीये.
खबरदारीचे उपाय म्हणून भारताने सर्वच देशांचे विसा रद्द केलेले आहेत. देशात आत्तापर्यंत कोरोना वायरसने 60 हून अधिक लोक संक्रमित झालेले दिसतायत तर एकीकडे अमेरिकाने एक महीन्यासाठी ब्रिटेन वगळता संपूर्ण यूरोप ला जाण्याचे बंद केले आहे कारण अमेरिकेत 30 हून जास्त राज्ये कोरोना वायरसने संक्रमित आहेत, याच कारणाने अनेक राज्यांनी इमरजेंसी घोषित केली आहे.तेथे वायरसने मेलेल्यांची संख्या संख्या 31 झालीये तर 1,037 लोक संक्रमित आहेत. हॉलीवुड सुपरस्टार टॉम हैंक्स वपत्नी रीता विल्सन कोरोना वायरसने संक्रमित असून ते सध्या फिल्म शूटिंग साठी ऑस्ट्रेलियात असल्याचे समजते.
माहाराष्ट्रात आत्तापर्यंत 10 कोरोनाबाधित केसेस आढळल्याने व सरकारी निर्देशांचे पालन करायलाच हवे म्हणून आम्ही कुठल्याही सभा अथवा सार्वजनिक रॅली करणार नाही असे एनसीपी नेता नवाब मलिक यांनी सांगितले.
गुरुवारी को थाईलैंडने 11 कोरोनाबाधित केसेस असल्याचे स्पष्ट केले. यामुळे दक्षिण पूर्व एशियाई देशांतील कुल केसेसची संख्या 70 झाली आहे तसेच एकाचा मृत्यू झालेला आहे. दक्षिण कोरियात 114 नवीन मामले समोर आले असून संक्रमित लोकांची संख्या 7,869 आहे. व मेलेल्यांची संख्या 66 आहे.
चीनच्या बाहेर कोरोना वायरस (COVID-19) चे 4,596 नवीन केसेस आढळल्यात, समाचार एजेंसी एएनआइच्या अनुसार संक्रमित लोकांची एकूण संख्या 37,371 झालीये. तर दुनियाभरातून अंदाजे एक लाख 20 हजार लोक कोरोना वायरसने संक्रमित आहेत. मरणाऱ्यांची संख्या 1,130 तर 4298 लोकं मृत पावल्येत.
कोरोना वायरसने चीन पाठोपाठ सगळ्यात ज्यादा प्रभावित इटली देश आहे, आत्तापर्यंत 827 मृत पावले असून 12 हजार हून जास्त संक्रमित झाल्येत. चीनच्या वुहान शहरातून पसरलेला हा वायरस 117 देशांत पसरलेला आहे.
समाचार एजेंसी रायटर्सच्या अनुसार चीनने बुधवारी कोरोना वायरसच्या 15 नवीन केसेस असल्याचे उघड केले. तिकडे तर 80,793 हून जास्त लोक संक्रमित आहेत तर मरणाऱ्यांची संख्या 3,169 एवढी झालीये.ज्यातील 10 मृत माणसे हुवेईतील असल्याचे समजते.
टिप्पणी पोस्ट करा