कोरोनापासून बचाव करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स...

कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे, शास्त्रज्ञ अजूनही कोरोनावर इलाज शोधत आहेत. काही महिन्यांतस ठोस असे वैद्याकीय उपचार शोधले जातील परंतु आपण घर, शाळा, कॉलेज,   कामाची ठिकाणे अगदी सर्वत्रच साफ-सफाई करणे गरजेचे आहे.अमेरिकेच्या  आरोग्य संस्था रोग नियंत्रण संस्थेने सांगितले आहे की, कोरोना व्हायरसपासून बचाव करायचा असेल तर सुरुवात प्रथम तुमच्या घरातील स्वच्छतेने करावी.




हे करा उपाय 

  • दैनंदिन जीवनात काय काळजी घेऊ शकाल यावर आपल्या प्रियजनांसोबत चर्चा करावी त्यातून काही नवीन उपाय सुचत असतील तर त्याची एक यादी बनवावी.
  • घराजवळील शेजारच्यांसोबत संकटकालीन परिस्थितीत काय करू शकता याबाबतही आराखडा आखावा जेणेकरून ऐनवेळी पॅनिक होणे टाळले जाईल.
  • कामाशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळालोकांपासून अंतर ठेवून राहा.
  • शिंकताना आणि खोकलताना तोंडावर रुमाल ठेवा.तसेच खोकला किंवा ताप असेल तर कोणाच्याही संपर्कात येऊ नका.
  • दिवसभरातून आपले डोळेनाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा.
  • हात, पाय साबणाने किंवा हँडवॉशने वीस सेंकद वेळेत तरी धुवा.ज्यामध्ये 60 टक्के अल्कोहोल आहे अशा शक्यतो सॅनिटाझरचा वापर करा.
  • सतत टिश्यूचा वापर करा व वापर केल्यावर तात्काळ तो टिश्यू बंद डब्यात फेकून द्या.
  • अस्वस्थ वाटल्यास डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्या.
  • घरातील लहान मुलांना सर्दी खोकला ताप असल्यास शाळेलाही कळवा.
  • आजारी असेल तर त्यांना क्लासला पाठवणेही बंद करा. घरीच शिकवणी घ्या.
  • आपल्या आप्तस्वकीयांना जर भेटू शकत नसाल तर किमान फोन करून चौकशी करा.
  • लहान मुलांनासुद्धा सकारात्मक वातातरणात ठेवा जेणेकरून त्यांना अशा कोरोनाबाबत भीतीच्या वातावरणात आधार वाटू शकेल

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने