वॉशिंग्टन - जगभर हाहाकार माजविणाऱ्या कोरोना व्हायरसने अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याने अमेरिकन प्रशासन हादरून गेलं असून अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणीबाणीची घोषणा केली असून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी 50 अब्ज डॉलरची तरतूद केली आहे. या आधी कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी स्पेननेही राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये तातडीची पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी वेळीच उपाय योजना केल्या नाहीत तर अमेरिकेतील 15 कोटी लोक या व्हायरसच्या कचाट्यात सापडू शकतात, अशी भीती ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली होती.येणाऱ्या काळात देशवासियांना मोठी किंमत मोजावी लागेल. आता त्याग केला तर येणाऱ्या काळात त्याचा फायदाच होईल, असं ट्रम यांनी म्हटलंय.
कोरोना व्हायरस जगात 118 ठिकाणी पसरलेला आहे, त्यामुळे आत्तापर्यत एकूण 4614 जण मरण पावले असून १ लाख २५ हजार लोक कोरोना व्हायरसने संक्रमित झाले आहेत.जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला महामारी म्हणून घोषित केले आहे.
कोरोना व्हायरस या महामारीमुळे ग्रासलेले प्रमुख दहा देश पुढीलप्रमाणे..

- चीन (80981 प्रकरणे)
- इटली (12462 प्रकरणे)
- ईराण (9000 प्रकरणे)
- रिपब्लिक ऑफ कोरिया (7983 प्रकरणे)
- फ्रांस (2281 प्रकरणे)
- स्पेन (2140 प्रकरणे)
- जर्मनी (1567 प्रकरणे)
- यूएसए (987 प्रकरणे)
- स्विजरलॅंड (815 प्रकरणे)
- जपान (620 प्रकरणे)
- भारत ( ९५ प्रकरणे )
टिप्पणी पोस्ट करा