आपल्या देशात स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रत्येकाच्या स्मार्ट फोन मध्ये व्हाट्स अँप हे लोकप्रिय मेसेंजर अँप नक्कीच आहे. जगभरातील करोडो युजर्स व्हॉट्सएपच्या माध्यमातून अवघ्या काही सेकंदात एकमेकांशी जोडले जातात. भारतात व्हाट्स अँपचे ४० कोटीहुन अधिक युझर्स आहेत. गेल्या काही दिवसांत 4000 हून अधिक ग्रुप इनव्हाईट लिंक्स गूगल सर्चमध्ये स्पोट झाल्या आहेत. यूजरर्सनी त्या लिंक रिपोर्ट केल्यावर त्यांना गूगल डेटाबेसवरून हटवण्यात आले आहे. Google सर्च मध्ये एखादी लिंक दिसणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु जर व्हाट्स एपवर तुम्ही एखादी ग्रुप इनव्हाइट लिंक तयार केलीत तर तुम्हाला नक्कीच काही खबरदारी राखणे जरुरीचे आहे. जर सावधगिरीने ते काम केले तर नक्कीच तुमचा फोन नंबर लिक होऊ शकणार नाही तसेच ग्रुप इनव्हाइट लिंक सगळ्यांना एक्सेसिबल होऊ शकणार नाही.
एकदा का तयार केलेल्या ग्रुपची लिंक सार्वजनिक झाली की ग्रुप मेंबर्सच्या मोबाईल नंबर्स पासून ते त्यांची अन्य माहिती देखील चोरली जाण्याची शक्यता असते हे सर्व टाळण्यासाठी तुम्हाला काही टीप्स देत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही ग्रुप इनव्हाईट लिंक्सना रिसेट करू शकता.
कुठल्याही ग्रुपची लिंक रिसेट करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही सदर ग्रुपचे एडमिन असणे महत्त्वाचे असते. ग्रुप एडमिनकडेच ग्रुपमध्ये कुठलेही बदल करण्याचा हक्क असतो.जर तुम्ही एखाद्या ग्रुपचे एडमिन असाल तर ग्रुप इन्फो सेटिंग्समध्ये इन्व्हाएट टू ग्रुप व्हाया लिंक ओप्शन वरती टॅप करावे.त्यानंतर तुम्हाला ग्रुप लिंक रिसेट करायचा पर्याय दिसेल. त्यावरती टॅप करुन तुम्ही ग्रुपची इनव्हिटेशन लिंक रिसेट करुन घ्या.
अशाप्रकारे तुम्ही जुन्या ग्रुप इनव्हाइट लिंकला डिसएबल करून नवीन ग्रुप नव्हाइट लिंक जनरेट करू शकाल. त्यामुळे जुन्या ग्रुप मेंबर्सकडे जुनी लिंक असेल तर ते ग्रुपला जोडले जाऊ शकणार नाहीत. कारण ग्रुप इनव्हाइट लिंकने युजर्सना जोडून घेण्येवजी कुठल्याही युजर्सना मॅन्युअली जोडणे सुरक्षित ठरते. ते करण्यासाठी तुम्ही ग्रुपमध्ये जाऊन एड मेंबर्स असं निवडून ज्यांना एड करायचे आहे त्यांच्या आयकोनवर जाऊन टॅप करावे. पण त्यासाठी ते मेंबर्स तुमच्या कौन्टॅक लिस्टमध्ये असणे खूप जरूरी आहे.
टिप्पणी पोस्ट करा