स्मार्टफोन बरेचजण वापरतात पण फोन वापरताना खूपदा त्याची बॅटरी गरम होण्याच्या अडचणींशी सामना करावा लागतो. जर तुमचा फोन थोडाफार गरम होत असेल, तर हरकत नाही पण जास्त गरम होणे स्मार्टफोनसाठी चांगले नाही.
बऱ्याचदा दुपारी घराबाहेर पडल्यावर फोन जास्त गरम होतो. तर अनेकदा फोन चार्जिंगला लावल्यावर किंवा नेट सर्च जास्त केल्यावर किंवा कॉल सुरू असताना वाढते. आपण नवीन फोन घेतानासुद्धा विचारतो की, फोन गरम नाही ना होणार? पण फोन गरम होण्यामागचे कारण वेगळेच असते म्हणजेच मोबाइल फोन गरम होण्याची कारणे विविध असतात. पण काही गोष्टींकडे लक्ष दिल तर आपण मोबाइलचं ओव्हरहिट होणं टाळू शकतो.
स्लीम स्मार्टफोन खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो, यासाठी अधिकाधिक स्लीम स्मार्टफोन बाजारात येत असतात. दिवसेंदिवस एप आणि डेटा प्रोसेसिंगची क्षमताही वाढतेय, स्क्रीनचं रिझोल्यूशन चांगलं होत असल्याने व्हिडीओ पाहणंही सोप झालंय. पण अनेकदा मोबाइल गरम झाल्याची तक्रार फोन युझर्सकडून केली जाते. फोनची बॅटरी गरम होऊ न देण्यासाठी तुम्ही हे सांगितलेले काही सोपे उपाय केलेत तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.
अनेकदा आपण मोबाईलमध्ये एखादे काम करत असताना एक सोडून अनेक एप्स बॅकग्राउंडला तशीच सुरु ठेवतो. त्यामुळे बॅटरी लवकर उतरते आणि फोन जास्त गरम होतो. त्यामुळे काम नसताना एकावेळी अधिक एप्स चालू ठेवणे टाळावे.
फोनची बॅटरी संपेल म्हणून फुल्ल चार्जिंग करण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा 100 टक्के चार्जिंग झाल्यानंतरही सुरु ठेवल्यास फोन गरम होत राहतो. यासाठी बॅटरी फुल्ल झाल्यावर चार्जिग सुरु राहणार नाही याची काळजी घ्या.
मोबाईल स्क्रीनचा ब्राइटनेस जास्त असेल तर त्याचाही परिणाम बॅटरीवर होतो. यासाठी आवश्यकता नसेल तेव्हा फोनचा ब्राइटनेस कमी ठेवा.
जर फोनमधील अॅप्स तुम्ही अपडेट ठेवलीत तर बॅटरी गरम होणार नाही. कारण फोनच्या सिस्टिमवर अनेक अॅप्समध्ये असलेले बग ताण वाढवतात. बग्स अपडेटमध्ये काढलेले असतात. त्यामुळे बॅटरी गरम होणार नाही.
स्मार्टफोनला कव्हरमध्ये ठेवल्याने मोबाइलमधील उष्णता बाहेर पडत नाही यामुळे फोन अधिकच गरम होतो. मोबाइलचे कव्हर(केस) काढल्याने मोबाइल गरम होण्याची समस्या नक्कीच कमी होईल.
मोबाईलमध्ये हेवी एप्स असतात, जे हेवी ग्राफिक्सचा वापर करतात. या एप्सना प्रोसेसिंग पावरही जास्त लागते. यामुळे डिवाइस गरम होऊ लागतात. म्हणून असे हेवी एप्स् वापर झाल्यानंतर ताबडतोब बंद करा म्हणजे मोबाइल गरम होणार नाही.
कधी स्मार्टफोनची चार्जिंग कॉर्डच खराब असते तर अशावेळीही मोबोईलची बॅटरी तापू शकते असे व्हायला नको असेल तर कॉर्ड बदलल्याशिवाय उपाय नाही.
वेगळ्या कंपनीचा चार्जर वापरल्यानेही मोबईल गरम होतो. आपण घाई घाईत कधी इतर चार्जरचा वापर करून तो फोन चार्ज करतो पण असा मोबाईल चार्ज केल्याने बॅटरीचं आयुष्यही कमी होते. त्यामुळे मोबाइल सोबत मिळालेल्या चार्जरनेच मोबाइल चार्ज करावा.
टिप्पणी पोस्ट करा