आर्थिक संकटात असलेल्या येस बॅंकेला केंद्र सरकारच्या आदेशानुसार स्टेट बॅंक मदतीचा हात देत आहे त्यामुळे येस बँकेच्या खातेदारांसाठी एक खुशखबर आहे. रिजर्व बॅंक औफ इंडियाने पूर्वी घातलेल्या निर्बंधानंतर बँकेच्या ग्राहकांना केवळ ५० हजार रुपये काढण्याची मुभा होती. मात्र, बँकेतून आता अधिकची रक्कम काढण्याची सवलत मिळणार आहे.
येस बॅंकेच्या ग्राहकांनी आता चिंता करण्याचे कारण नाही आता बँकेतून पाच लाखांची रक्कम काढता येणार आहे. ही पैसे काढायची परवानगी काही अटीशर्थींसह देण्यात आली आहे. याचा बँकेच्या खातेदारांना फायदा होणार आहे.
येस बँकेवर RBI ने निर्बंध आणल्यानंतर, बँकेच्या खातेदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता बँकेने आजपासून गरजेचे असल्यास, पाच लाखांची रक्कम बँकेतून काढता येणार असल्याचे स्पष्ट केले. परंतु खातेधारकांना याबाबत बँकेला पत्र देऊनच पैसे काढण्याची अट घालण्यात आली आहे. येस बैंकेतून ग्राहकांना जे पैसे काढावयाचे असतील त्यामध्ये वैद्यकीय उपचारांसाठी, शिक्षणासाठी, लग्नासाठी खातेदार ही रक्कम काढू शकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. येस बँक उद्ध्वस्त करण्यामागे तीन बहिणींचा हात असल्याचं म्हटलं जात आहे. या तीन सख्ख्या बहिणी आहेत. राधा कपूर, राखी कपूर आणि रोशनी कपूर अशी यांची नावं आहेत. येस बँकेचे माजी सीईओ राणा यांच्या त्या मुली आहेत. येस बँक घोटाळ्यात हे तीन चेहरे तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत.
टिप्पणी पोस्ट करा