चंद्रपूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत माहिती अधिका-यांची चार पद भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. पण तीन वर्ष लोटूनही या पदाचं नेमकं काय झालं हा प्रश्नच निर्माण झाला आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून तर डोक्यावर हात मारण्याची वेळ इच्छुक उमेदवारांवर आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत येणा-या चार माहिती अधिकारी पदासाठी सन 2017 मध्ये जाहिरात काढण्यात आली. 59/2017 या क्रमाकांच्या या जाहिरातीनूसार राज्यातून अनेक उमेदवारांनी आपआपले ऑनलाईन अर्ज सादर केले. आज ना उदया परिक्षेबाबत लोकसेवा आयोगाकडून यासंदर्भातील सुचना देण्यात येईल अशी अपेक्षा होती.पण तीन वर्षापुर्वी काढण्यात आलेल्या या पदाबाबत आयोगाने एक पाऊलही पुढं टाकलं नाही.
याबाबत दिपक वांढरे या कार्यकर्त्याने लोकसेवा आयोगाकडे या पदाबाबत माहिती मागितली.यानंतर लोकसेवा आयोगाने दिलेले उत्तर बघून डोक्यावर हात मारण्याचीच वेळ आली.कारण त्यांनी दिलेल्या माहितीनूसार चार माहिती अधिकारी पदासाठी एकून 164 अर्ज प्राप्त झाले असून त्याची छाननी करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.
164 अर्ज छाननीसाठी जर तीन तीन वर्षाचा कालावधी लागत असेल तर आपल्या प्रशासकिय व्यवस्थेबाबत बोलायचे तरी काय असा प्रश्न आता उमेदवार विचारू लागले आहेत.राज्यात नवीन सरकार आलय.आल्याआल्या त्यांनी कामांचा धडाका लावला आहे.सामान्य प्रशासन विभाग हा दस्तुरखुद मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे आहे.त्यामुळे ते तरी उमेदवारांची वेटिंगचे रूपाांतर वांचींग मध्ये करतील का याकडे आता लक्ष आहे.
टिप्पणी पोस्ट करा