A रक्त गट असणाऱ्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका ...



ज्यांचा रक्त गट 
असा आहे त्यांना कोरोनाचा सर्वात अधिक धोका असतोअसे संशोधनातून समोर आले आहे. जगात कोरोना व्हायरसने कहर सुरूच ठेवला आहे. आता भारतातही त्याचे पाय पसरले आहेत. अशातच या आजारावर विविध प्रकारचे संशोधनही केले जात आहे. अलिकडेच वुहानमधील वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूच्या मुळाशी पोहोचण्यासाठी सुमारे 2173 कोरोना व्हायरसने संक्रमित झालेल्या लोकांचा अभ्यास केला आहे. संशोधनात असे आढळले आहे की विशिष्ट रक्त गटातील लोकांनाच कोरोना व्हायरसचा हा आजार लवकर होत आहे तर इतर रक्तगटातील लोकांना त्याचा इतका त्रास होत नाही.

एका ब्रिटीश वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसारहुबेई प्रांतातील तीन रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाव्हायरस-संक्रमित रुग्णांमध्ये सुमारे 206 लोकांचा मृत्यू झाला. आश्चर्याची बाब म्हणजे यापैकी 85 जणांचा रक्त गट A होता. ज्या 2173 संक्रमित लोकांवर संशोधकांनी शोध लावला होतात्यातील सुमारे 38 टक्के लोक रक्तगट चे आहेत असे आढळले. त्याचवेळीत्यांच्यामध्ये रक्तगटाचे लोक होते, ज्यांना कोरोना व्हायरसचा सर्वात कमी त्रास झाला होतो. रक्तगटाचे लोक केवळ 26 टक्के होते ज्यांना कोरोनव्हायरसची लागण झाल्याचे आढळले.


चीनच्या टियानजिनमधील स्टेट लेबोरेटरी ऑफ एक्सपेरिमेंटल हेमॅटोलॉजी येथील वैज्ञानिकगाओ यिंगदाई म्हणाले कीया संशोधनामुळे कोरोनावरील उपचार शोधण्यात मदत होईल. तर शास्त्रज्ञांनी असेही सांगितले की, यापूर्वी एक भयंकर रोग पसरला होता तो म्हणजे सार्स. त्यावेळी रक्तगट चे लोक कमी आजारी होतेतर उर्वरित रक्तगटातील लोक मोठ्या प्रमाणात सार्स ने प्रभावित झाले होते.

दरम्यान, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की रक्तगट A असलेल्या लोकांना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहेपरंतु इतर रक्तगटातील लोकांनी हा आजार हलक्यात घेऊ नये. कारण निष्काळजीपणामुळे एखाद्याचा मृत्यूही होऊ शकतो. सध्या जगात 187,725 लोक कोरोना व्हायरसमुळे संक्रमित आहेत. तथापि  7822 लोक मरण पावले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने