महाराष्ट्रात कोरोना रुग्णाची संख्या ६३


मुंबई - महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या  रूग्णांची संख्या 63 झाली आहे. यातील एकाचा मृत्यूही झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या म्हणण्यानुसार, एका दिवसात 11 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. यातील आठ जण परदेशातून आले आहेत. तीन लोक त्यांच्या संपर्कात आले आणि त्यांना संसर्ग झाला आहे.

राज्यात एका दिवसात 11 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. काल राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 52 होता, जो आज वाढून 63 वर पोहोचला आहे. नवीन 11 रुग्णांपैकी 10 रुग्ण मुंबईतील आहेत,

स्थिती आणखी गंभीर होऊ नये यासाठी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय टाळावं आणि गरज नसल्यास बाहेर पडू नये, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

भारतात  कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 258 होती. आता ही संख्या वाढून 260 झाली आहे. देशात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. 22 लोक बरे झाले आहेत.


 नोएडामध्ये कोरोना विषाणूचा आणखी एक रुग्ण असल्याची पुष्टी झाली आहे. गौतम बुध नगर डीएम बीएन सिंह यांच्या म्हणण्यानुसार सुपरटेक कॅपटाउन सोसायटीमध्ये एका व्यक्तीला लागण झाल्याची घटना घडली आहे. डीएम बीएन सिंग यांनी आज ते 23 मार्च या कालावधीत सोसायटी परिसर सील करण्याचे आदेश दिले. याशिवाय येथील रहिवाशांनी त्यांच्या निवासस्थानी राहण्याचे आदेश दिले आहेत. भारतात 250 पेक्षा जास्त केसेसची पुष्टी झाली आहे. त्याचवेळी 4 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने