दोन दशकांनंतर आयव्हीएफद्वारे प्रथमच जन्मली चित्त्याची पिल्ले


अमेरिकेच्या कोलंबस प्राणिसंग्रहालयात, जगातील पहिल्या आयव्हीएफ चित्ताच्या शावकांनी आपले डोळे उघडले तेव्हा शास्त्रज्ञांना देखील आशा होती की ते मांजरी प्रजातीतील हा अद्भुत प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना ते या प्राण्याचे जतन करू शकतील. या शावकांना नेशनल झूच्या वैज्ञानिकांच्या मदतीने, तीन वर्षांची सरोगेट मादीचित्ता इझीकडून जन्माला घालण्यात आलेतर शावकांची जीवशास्त्रीय,मूळजी आई ही किबीबी नावाची सहा वर्षांची मादीचित्ता आहे.

आतापर्यंत फक्त स्त्रियाच इन विट्रो फर्टिलायझेशन प्रक्रियेद्वारे (आईव्हीएफ) मूल जन्माला घालण्याचा आनंद मिळवू शकत होती. परंतु बर्‍याच काळापासून चित्त्यांची लोकसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील होते व वैज्ञानिकांनी प्रथमच मादी चित्तावर हे आईव्हीएफ तंत्र वापरले आणि अलीकडेच ते या प्रयोगात यशस्वीही झाले आहेत.  

20 वर्षांपासून जन्मासाठी प्रयत्नशील
कोलंबिया जिल्ह्यातील नॅशनल प्राणिसंग्रहालयाच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हिमयुगाच्या शेवटच्या दशकांपासून चित्ता प्रजात नामशेष होण्याच्या मार्गावर होती. तसेच बर्‍याच वर्षांत त्यांची लोकसंख्या नैसर्गिकरित्या वाढविण्यासाठी शास्त्रज्ञांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले होते.
मागील 20 वर्षांपासूनझू शास्त्रज्ञ आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे आणि मादीचित्तांच्या भ्रूण हस्तांतरणाच्या माध्यमातून चित्त्यांची लोकसंख्या वाढविण्याचा प्रयत्न करीत होते. ओहायोतील कोलंबस प्राणिसंग्रहालयात व्हर्जिनियाच्या स्मिथसोनियन कन्झर्वेशन बायोलॉजी इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांच्या मदतीने हे काम केले गेले.
  
सध्या केवळ 7500 चित्ताच जिवंत
खरेतर चित्त्यांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने त्यांची संख्या 25 टक्क्यांच्या प्रमाणात झपाट्याने कमी होत आहे. ही  त्यांच्या आयव्हीएफ तंत्रज्ञानाची प्रक्रिया वैज्ञानिकांनी तिसऱ्यांदा केली आणि ती प्रथमच यशस्वी झाली. आयव्हीएफ टीमचे वैज्ञानिक पियरे कॉमेझोली म्हणतात की, आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून लोकसंख्या वाढविणारी ही दुसरी प्रजाती आहे. यापूर्वी 1990 मध्ये वाघांची संख्या वाढविण्यासाठीही हे तंत्र यशस्वीरित्या वापरले गेले होते. इज्जीने नर व मादी चित्ताला जन्म दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे आफ्रिकेत चित्ता ही प्रजाती 13 व्या शतकापासूनच धोक्यात आली होती. नैसर्गिक वस्तींमध्ये सध्या केवळ 7500 चित्ताच जिवंत आहेत. म्हणूनच इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरने त्यांना धोकादायक प्रजाती घोषित केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने