इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू कोरोना पॉजिटिव्ह 





इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू  हे कोरोना व्हायरसने पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्यानंतर लगेचच त्यांनी स्वत: ला अलग केले आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनाही कोरोनाची लक्षणे आढळली होती. कोरोना विषाणूची लागण होणारे बेंजामिन नेतन्याहू  हे जगातील दुसरे राष्ट्रप्रमुख असतील.यापूर्वी ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स देखील कोरोनाने पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले होते, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

नेतन्याहूची बातमी आल्यापासून नेतान्याहू यांच्या कार्यालयाची स्वच्छता करण्यात आली आहे तसेच येथे काम करणाऱ्या कर्मचार्‍यांच्याही चाचण्या घेण्यात येत आहेत.नेतन्याहू यांना किती काळ अलग ठेवण्यात येईल याबाबत तेथील आरोग्य विभागच निर्णय घेईल.आरोग्य मंत्रालय आणि खासगी डॉक्टरांकडून मंजुरी मिळेपर्यंत नेतन्याहू वेगळे राहतील. त्यांचे निकटवर्ती आणि सल्लागार देखील वेगळे रहात आहेत.

इस्राईल देशामध्ये आतापर्यंत 4300 पेक्षा जास्त लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. येथे 15 लोक मरण पावली आहेत. जेथे अनेक दिवसांपासून सावधगिरी बाळगण्यास सुरू आहे अशा देशांपैकी एक इस्रायल देश आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नेतन्याहू यांनी या कठीण परिस्थितीत देशवासीयांना त्यांच्या घरीच रहाण्याचे आवाहन केलेले आहे. तसेच लोकांशी हातमिळवणी करण्याऐवजी भारतीय परंपरेनुसार हात जोडून त्यांचे अभिवादन करण्याचेही देशातील जनतेला सांगितले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने