पूर्वीपासूनच जगातील सर्वात सुंदर ठिकाणांमध्ये इटलीतील वेनिस शहराचा समावेश आहे, त्यामुळे येथे वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी दिसत असते. वेनिस शहर चोवीस तास गजबजलेले आहे, परंतु कोरोनाच्या भीतीमुळे इथल्या प्रत्येक रस्त्यावर नीरव शांतता पसरली आहे.
चीनच्या खालोखाल कोरान व्हायरसचा सर्वात जास्त फटका इटलीला बसलेला आहे.एका अंदाजानुसार, इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे 2500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि या धोकादायक व्हायरसचा परिणाम हजारो लोकांवर झालेला आहे, इटलीमधील मोठी शहरे पूर्णपणे बंद (लॉक डाउन) आहेत.
सहसा वेनिस शहर हे पर्यटकांनी भरलेले असते पण कोरोनामुळे कुठेच गजबजाट नाहीये, अगदी शहराच्या आसपासच्या ठिकाणांना भेट देणारे स्थानिक नागरिक, पर्यटकही दिसत नाहीत. एकीकडे पर्यटकांची तीव्र कमतरत दिसत असून हे शहर पूर्णपणे नीरस दिसत असले तरी दुसरीकडे येथील कालव्याचे पाणी मात्र आता स्पष्ट, स्वच्छ दिसू लागले आहे. सद्यस्थितीत इथल्या शहरांतील कालव्याचे पाणी इतके स्वच्छ व स्पष्ट झाले आहे की त्यातील पोहणारे मासे मासेसुद्धा पूर्णपणे दिसत आहेत.अशा परिस्थितीत इतर प्राणीपक्षीसुद्धा इथल्या कालव्यांपर्यंत पोहोचत आहेत, त्यामुळे आता या कालव्यांच्या काठावर पांढरे बगळेदेखील पाहिले जाऊ शकतात.
व्हेनिसमध्ये सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने सर्व घाण या कालव्यांमध्ये वाहून येते. येथे राहणाऱ्या व्यापाऱ्यांच्या म्हणणण्यानुसार, साबणापासून सर्व प्रकारचा कचरा कालव्यात विरघळला जातो. कोरोनाला याचे श्रेय देताना बरेच लोक म्हणाले की, या कोरोना व्हायरसच्या आजारामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यात प्रथमच असे स्वच्छ, सुंदर कालवे आणि वातावरण अनुभवायला मिळत आहे.
टिप्पणी पोस्ट करा