कोरोना अथवा कोविड 19 व्हायरसने संपूर्ण जगामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे पण छत्तीसगडमध्ये जन्मलेल्या भावाबहिणीची नावेच कोरोना आणि कोविड अशी आहेत. रायपूरच्या जुन्या वस्तीतील रहिवासी विनय वर्मा आणि प्रीती वर्मा यांनी आपल्या जुळ्या मुलांची आणि मुलींची नावे कोविड आणि कोरोना अशी ठेवली आहेत आणि त्यांना भावंडे बनवले आहेत.
रायपूरला रहात असलेल्या श्रीमती वर्मा यांनी सुमारे आठवडाभरापूर्वी रायपूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये जुळ्या मुलांना जन्म दिलाय, त्या जुळ्यांत एक मुलगा आणि एक मुलगी असे आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्या बाळांची नावे ठेवली गेली ज्यामध्ये मुलाचे नाव कोविड आणि मुलीचे नाव कोरोना असे ठेवण्यात आले.
याबद्दल श्रीमती वर्मा यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, सध्या सर्वांच्या डोक्यात कोरोना हाच विषय घोळत आहे किंवा सगळीकडे कोरोना,कोविड विषयीचे चर्चा आहे आणि म्हणूनच आम्ही लोकांमधील कोरोना बाबत असलेली भीती दूर करण्यासाठी मुलाचे नाव कोविड तर मुलीचे नाव कोरोना असे ठेवण्याचे ठरवले. दरम्यान, काही लोकांनी सोशल मीडियावर आमच्या निर्णयाचे समर्थन केले आहे तसेच बहुतेकांनी यावर टीकासुद्धा केलेली आहे.
टिप्पणी पोस्ट करा