लॉकडाऊनमध्ये घरबसल्या असे उघडा डीमॅट खाते



कोव्हिड-१९चा हादरा बसला, तेव्हा भारतीय शेअर बाजाराचा व्यापार दर तिमाहीत नवीन उच्चांक गाठत होता. या उद्रेकाने जेव्हा भारतावर पकड घेतली, तेव्हा मात्र बहुतांश निर्देशांक घसरले. २३ मार्च रोजी लॉकडाउन जाहीर होईपर्यंत शेअर्सनी मूल्यापैकी जवळपास ४०% मूल्य गमावले.
लॉकडाउन लागू झाल्यापासून शेअरबाजारात जवळपास ३० टक्के वाढ झाली आहे. तसेच तो अजूनही दर महिन्याला नवनवीन पातळ्या गाठत आहे. कारण शेअर बाजार कधीही थांबत नाही! अर्थात, कोव्हिडमुळे लॉकडाउन असल्याने हा बाजार वास्तविक क्षमतेपासून दूरच आहे. त्यामुळे कोणताही अनुभवी गुंतवणूकदार सांगेल की, सध्याचा काळ हा लाँग्स म्हणजेच दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे.
ट्रेडिंगच्या प्रवासाला सुरुवात करताना डीमॅट खाते आवश्यक असते. ते कसे उघडावे आणि आधीच खाते असले तरीही घरच्या घरी आरामात आपण ते कसे सेट करु शकतो याबद्दल जाणून घेऊयात.
१. ट्रेड्सप्रमाणाचे ब्रोकरची निवडही हुशारीने करा: अखंड ऑनबोर्डिंग प्रक्रिया, उत्कृष्ट ब्रोकरेज चार्जेज आणि मूल्यवर्धित गुंतवणूक सेवा देणारी डिजिटल ब्रोकिंग फर्म (अॅप किंवा वेब आधारीत) शोधा. काही ब्रोकिंग हाउसकडे काही व्यवसायांवर झिरो ब्रोकरेज फी आणि इतरांवर फ्लॅट रेट असतात. हे दोन्ही घटक फायदेशीर आहेत, कारण ते आपल्याला व्यापार करताना आवश्यक किंमत मिळवून देतात.
तुम्ही डिजिटली ट्रेडिंग करणार आहात, त्यामुळे तुम्ही पसंत केलेल्या प्लॅटफॉर्मवर कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही, हे सुनिश्चित करण्याकरिता अधिक प्रयत्न करा. कारण अशी तांत्रिक अडचण तुम्हाला थेटपणे संकटात आणू शकते. ब्रोकिंग फर्मचा शोध घेताना सखोल संशोधन आणि वैयक्तिक गुंतवणुकीच्या शिफारशी हे दोन घटकही महत्त्वाचे ठरतात.
२. स्वत:ची नोंदणी करा; वेळ हाच ट्रेडिंगमधील महत्त्वाचा घटक : सर्व डिजिटल ब्रोकिंग कंपनीकडे ऑनलाइन ग्राहकांची ऑनबोर्डिंग प्रक्रिया असते. डिजिटल अकाउंट ओपनिंग फॉर्म भरा आणि तुमचे आवश्यक ओळख आणि पत्त्याचे पुरावे अपलोड करा. या केवायसी डॉक्युमेंट्समध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट इत्यादींचा समावेश होतो. ब्रोकिंग फर्म हेल्पलाइनद्वारे तुम्हाला येणा-या अडचणींमध्ये मदत करतात.

३. पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा: तुम्ही सादर केलेल्या पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी एक एक्झिक्युटिव्ह नियुक्त केला जाईल. तुमच्या ब्रोकिंग फर्मच्या प्रतिनिधीद्वारे फोनमार्फत किंवा थेट तुमच्या घरी भेट देऊ एक सोपी पण महत्त्वाची प्रक्रिया पार पाडली जाईल. सध्याच्या काळात टेली व्हेरीफिकेशन पद्धतच बहुतांशरित्या वापरली जाईल. काही ब्रोकरेज फर्ममध्ये ही संपूर्ण प्रक्रिया सुरुवातीचा अर्ज भरण्यापासून एका तासाच्या आतच पूर्ण करतात.
४. खात्याचा तपशील मिळवा: एकदा पडताळणी झाल्यानंतर तुमचे अकाउंट शेअर ट्रेडिंगसाठी अधिकृतरित्या मंजूर होईल. तुम्हाला एक वेलकम किट मिळेल. यात युनिक आयडी आणि खाते अॅक्सेस करण्यासाठीचा पासवर्ड इत्यादी डिटेल्स असतील.
५. ट्रेडिंगसाठी तयार व्हा: अशा प्रकारे, अखेर तुम्ही पहिले ट्रेडिंग करण्यासाठी तयार आहात. तत्पूर्वी ट्रेडिंगमध्ये नवीन आहात, त्यामुळे तुम्ही संदर्भ सामग्रीचा अभ्यास करा तसेच ट्रेडिंगची मूलतत्त्वे शिकवणा-या वेबिनार्सना उपस्थित रहा. गरज असल्यास तुम्ही तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला विविध बँकेची खातीही जोडू शकता. त्यामुळे एखाद्या अत्यंत गरजेच्या ट्रेडिंगमध्ये तुम्ही तत्काळ टॉप अप्स करू शकता. तुमची गुंतवणूक भरपूर नफा मिळवून देणारी ठरो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने