धक्कादायक : अमिताभ पाठोपाठ ऐश्वर्या,आराध्या यांना कोरोनाची बाधा



मुंबई - महानायक अमिताभ  बच्च्चन, त्यांचा मुलगा अभिषेक  बच्च्चन, पाठोपाठ आता सून ऐश्वर्या रॉय -  बच्च्चन, तसेच नात आराध्या हिचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. पत्नी जया बच्च्चन  यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.  बच्च्चन कुटुंबातील चार सदस्यांना कोरोना झाल्याने चित्रपट सृष्टीत खळबळ उडाली आहे.

महानायक अमिताभ  बच्च्चन यांनी स्वतः ट्विट करून आपणास कोरोनाची बाधा झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांना नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर अभिषेक  बच्च्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला होता. आज सून ऐश्वर्या रॉय -  बच्च्चन, तसेच नात आराध्या हिचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे.


बंगल्याचं सॅनिटायजेशन
अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या १० दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेतली जात आहे. तसेच अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला कंटेन्मेंट झोन म्हणन घोषीत करण्यात आला आहे. यासोबतच त्यांच्या बंगल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सॅनिटायजेशन करण्यात येत आहे.

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती अगदी वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरली. त्यानंतर अमिताभ बच्चन यांचे चाहते, सेलिब्रेटी, क्रिकेटर्स, राजकीय नेत्यांकडून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात येत असल्याचं पहायला मिळत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने