जगातील दोन मोठ्या अर्थसत्तांमधील दरी वाढल्याने सोन्याच्या दरात वृद्धी




मुंबई -  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबतचे महत्त्वाचे व्यापारी करार रद्द केले. तसेच चीनने हाँगकाँगवर लादलेल्या प्राचीन सुरक्षा कायद्याविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच दक्षिण चिनी समुद्रावरील वाढत्या तणावामुळे भौगोलिक संकटही निर्माण झाले. परिणामी पिवळ्या धातूचे दर वाढले. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की कोरोना विषाणूसंसर्गाची संख्या वाढल्याने अर्थव्यवस्थेभोवतीची चिंता वाढली. परिणामी बुधवारी स्पॉट गोल्डचे दर ०.२१ टक्क्यांनी वाढून ते १८११.३ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. अर्थव्यवस्था सुधारणेच्या वाढीव आणि विलंबित कालावधीमुळे गुंतवणुकदारांनी सोन्याच्या सुरक्षित मालमत्तेकडे कल दर्शवला.
कच्च्या तेलाचे दर दर २.२६ टक्क्यांनी वाढले व ते ४१.२ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाले. अमेरिकी क्रूड ऑइल यादीत घसरण झाल्याने हे परिणाम दिूसन आले. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशननुसार, मागील आठवड्यात अमेरिकी क्रूड यादीत ७.५ दशलक्ष बॅरलने घसरण झाली. सर्व प्रमुख तेल निर्यातक देशांनी तीव्र उत्पादन कपातीचा निर्णय घेतल्याने तेलाच्या किंमती निरंतर वाढत आहेत.  
तथापि, कच्च्या तेलाच्या मागणीत सुधारणा दिसून आल्याने ओपेक आणि त्यातील सदस्या राष्ट्रांनी ऑगस्ट २०२० नंतर तेलातील २ ते ७.७ दशलक्ष बीपीडी कपात कमी करण्याची योजना आखली आहे. साथीसंबंधी लॉकडाउन पुन्हा सुरू होत असल्याने हवाई वाहतुकीवरील निर्बंध अजूनही कायम आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीतील वाढीवर मर्यादा आल्या आहेत.
कोरोना विषाणूचे वाढते रुग्ण, अमेरिका-चीन संबंधातील तणाव यामुळे औद्योगिक धातूची मागणी कमी झाली. परिणामी बुधावरी, लंडन एक्सचेंज (एलएमई)ते दर घसरले. या समूहात झिंकला सर्वाधिक नुकसान झेलावे लागले.
चीनच्या पिपल्स बँक ऑफ चायना (पीबीओसी) सह जगभरातील मध्यवर्ती बँकांनी प्रोत्साहन आणि मदतपर योजना राबवल्याने धातूच्या किंमतींना आधार मिळाला. अर्थव्यवस्था मंदीकडे जाण्यापासून रोखण्यासाठी नव्या कर्जयोजनांचीही घोषणा करण्यात आली.
एलएमई कॉपरचे दर १.७३ टक्क्यांनी घसरले व ते ६३८६.० डॉलर प्रति टनांवर बंद झाले. प्रमुख निर्यातक देश पुरवठ्यातील मोठ्या अडचणींना सामोरे जात असल्याने तसेच नव्या अमेरिका-चीन शत्रुत्वामुळे तांब्याच्या किंमतीवर ताण आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने