सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात तेजी


मुंबई, ७ जुलै २०२०: आज सलग पाचव्या दिवशी आयटी आणि वित्तीय शेअर्सच्या नेतृत्वाखाली भारतीय शेअर बाजाराने वृद्धी दर्शवली. निफ्टीने १० हजारांच्या पुढची पातळी कायम राखली. तो ०.३३% किंवा ३६.०० अंकांनी वधारला. निफ्टी १०,७९९.६५ अंकांवर स्थिरावला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.५१% किंवा १८७.२४ अंकांनी वाढला व ३६,६७४.५२ वर विसावला.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास १३१२ शेअर्सनी प्रगती केली तर १५१ शेअर्स स्थिर राहिले. तर १३७४ शेअर्स घसरले. बजाज फायनान्स (७.७६%), इंडसइंड बँक (५.८६%), बजाज फिनसर्व्ह (४.४७%), इन्फोसिस (३.३९%) आणि आयसीआयसीआय बँक (३.५२%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर अदानी पोर्ट्स (३.५३%), पॉवर ग्रिड कॉर्प (२.९८%), आयटीसी (२.६५%), एनटीपीसी (२.५२%), आणि ग्रासिम इंडस्ट्रीज (२.८७%) हे निफ्टी लूझर्समध्ये समाविष्ट झाले.
देशांतर्गत इक्विटी बाजारातील व्यापार अस्थिर दिसून आला आणि भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७४.९३ रुपयांवर बंद झाला.
जगभरात कोव्हिड-१९ च्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने गुंतवणूकदारांवर याचा परिणाम झाला. त्यामुळे आजच्या व्यापारी सत्रात सोन्याच्या किंमती स्थिर राहिल्या.
किंमतीतील लक्ष्य आणि तिमाही वितरण वाढल्याने टेस्ला इंकच्या शेअर्समध्ये १३% वाढ झाली. आजच्या व्यापारी सत्रात नॅसडॅकचे शेअर्स २.२१ % नी वाढले. कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने जागतिक बाजारात नकारात्मक ट्रेंड दिसून आला. त्यामुळे युरोपियन बाजारातही घसरण दिसून आली. एफटीएसई एमआयबी ०.१३%, एफटीएसई १०० १.३१%, निक्केई २२५चे शेअर्स ०.४४% तर हँगसेंगचे शेअर्स १.३८% नी खाली घसरले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने