अस्थिर व्यापारी सत्रांमध्ये बेंचमार्क निर्देशांकात घसरण

 निफ्टी ४५.४० तर सेन्सेक्स १४३.३६ अंकांनी घसरला


मुंबई, १० जुलै २०२०: अस्थिर सत्रांमध्ये जागतिक बाजारपेठेसह भारतीय बाजारात घसरणीचा व्यापार दिसून आला. आजच्या व्यापारी सत्रात बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात घसरण दिसून आली. निफ्टी ०.४२% किंवा ४५.४० अंकांनी घसरला व तो १०,७६८.०५ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.३९% किंवा १४३.३६ अंकांनी घसरला. व तो ३६,५९४.३३ अंकांवर स्थिरावला.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की, आज जवळपास १६४६ शेअर्स घसरले, ९८९ शेअर्सनी नफा कमावला तर १५९ शेअर्स स्थिर राहिले. इंडसइंड बँक (२.९३%), अॅक्सिस बँक (३.१६%), गेल (२.९४%), टायटन कंपनी (२.६८%), एचडीएफसी (२.७५%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (३.०७%), सन फार्मा (२.२९%), एचयूएल (२.४९%), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (१.४३%) आणि भारती एअरटेल (१.०६%) हे आजच्या व्यापारी सत्रात निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. फार्मा, एफएमसीजी आणि ऊर्जा क्षेत्रांमध्ये सकारात्मक व्यापार झाला तर बँकिंग आणि धातूच्या क्षेत्रात घसरणीचा व्यापार दिसून आला.
देशांतर्गत इक्विटी बाजारात अस्थिर व्यापारी सत्रामुळे खरेदी दिसून आली. त्यामुळे भारतीय रुपयाने आज घसरण घेतली. रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७५.२० रुपयांवर स्थिरावला.
आजच्या व्यापारी सत्रात पिवळ्या धातूचा व्यापार काहीसा फ्लॅट झाला. जगभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांमुळे चिंता निर्माण झाल्याने एमसीएक्सवरही नकारात्मक कल दिसून आला.
आजच्या व्यापारी सत्रात जागतिक बाजारपेठ कमकुवत दिसून आली. युरोपियन बाजारातही घसरणीचा व्यापार दिसून आला. मात्र सत्राचा शेवट सकारात्मक झाला. एफटीएसई एमआयबी ०.७८% तर एफटीएसई१०० चे शेअर्स ०.५९% नी वाढले. तर दुसरीकडे कोरोना विषाणूचे वाढते रुग्ण आणि त्यामुळे संबंधित आर्थिक सुधारणेच्या चिंतेमुळे आशियाई स्टॉक्स आणि अमेरिकी स्टॉक्सदेखील घसरले. नॅसडॅकचे शेअर्स ०.६३% नी वाढले. निक्केई २२५ आणि हँग सेंग कंपनीचे शेअर्स अनुक्रमे १.०६% आणि १.८४% नी घसरले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने