~ सेन्सेक्सने घेतली ५४८.४६ अंकांची उसळी ~
मुंबई, १७ जुलै २०२०: आज सलग पाचव्या दिवशी भारतीय निर्देशांकांनी सकारात्मक व्यापार केला. यात इन्फ्रा, ऊर्जा, बँकिंग स्टॉक्सनी नफ्याचे नेतृत्व केले. निफ्टीने १.५१% किंवा १६१.७५ अंकांची वृद्धी घेतली व तो १०,९०१.७० अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सने १.५०% किंवा ५४८.४६ अंकांची वाढ घेऊन ३७,०२०.१४ अंकांवर विश्रांती घेतली.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास १६२२ शेअर्सनी नफा कमावला, ९७८ शेअर्स घसरले तर १५३ शेअर्स अस्थिर राहिले. बीपीसीएल (१२.४३%), ओएनजीसी (५.८४%), भारती इन्फ्राटेल (४.३२%) आणि टायटन (३.७१%) हेनिफ्टीतील टॉप गेनर्स ठरले तर हिंडाल्को इंडस्ट्रिज (१.९०%), ब्रिटानियया इंडस्ट्रिज (१.८६%), नेस्ले (१.४७%), टीसीएस (१.२०%) आणि इन्फोसिस (०.५९%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. आयटी क्षेत्र वगळता आज सर्व सेक्टरल निर्देशांकात सकारात्मक व्यापार झाला. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅपने अनुक्रमे १.५५% आणि १.११% ची वाढ अनुभवली.
एलअँडटी फायनान्स होल्डिंग लि.: एलअँडटी फायनान्स होल्डिंग्स लिमिटेडचे शेअर्स ३.५१% नी वाढले व त्यांनी ६१.८५ रुपयांवर व्यापार केला. २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात ७३% ची घट झाली. उच्च आकस्मिक तरतुदींमुळे ही घसरण झाली.
कॅडिला हेल्थकेअर: कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडच्या स्टॉक्समध्ये ४.६३% ची वाढ झाली व त्यांनी ३७७.६० रुपयांवर व्यापार केला. कंपनीला कोव्हिडवरील उपचारांसाठी पेगिलेटेड इंटरफेरॉन अल्फा-२ बीच्या मेक्सिकोतील क्लिनिकल चाचण्यांसाठी मान्यता मिळाली. त्यानंतर स्टॉक्सवर हे परिणाम दिसून आले.
ब्रिटानिया इंडस्ट्रीज: ब्रिटानिया इंडस्ट्रीजचा २ ०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा ५४२.६ कोटी रुपये आणि महसूल ३४२०.७ कोटी रुपये नोंदवला गेला. तरीही कंपनीचे स्टॉक्स १.८६% नी घसरले व त्यांनी ३७८३.०० रुपयांवर व्यापार केला.
देशांतर्गत इक्विटी बाजारात सकारात्मक ट्रेंड दिसून आल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ७५.०२ रुपयांवर स्थिरावला.
आजच्या व्यापारी सत्रात एमसीएक्सवर सकारात्मक कौल देत सोन्याने किरकोळ उच्चांक गाठला. ऑगस्टमधील सोन्याचा वायदा ०.०९% नी वाढून ४८,८१५ रुपयांवर गेला.
कोव्हिड-१९ संसर्गाची वाढती संख्या आणि अमेरिका-चीनदरम्यानचा वाढता तणाव, अशा स्थितीतही जागतिक बाजाराने आजच्या व्यापारी सत्रात मजबूत स्थिती दर्शवली. एफटीएसई १०० ने ०.५६% आणि एफटीएसई एमआयबीने ०.०१ टक्क्यांनी वृद्धी दर्शवली. हँगसेंगनेही ०.४७%ची वाढ घेतली तर नॅसडॅक आणि निक्केई २२५ कंपनीने अनुक्रमे ०.७३% आणि ०.३२ टक्क्यांनी घट अनुभवली.
टिप्पणी पोस्ट करा