मुंबई, १० ऑगस्ट २०२०: भारतीय निर्देशांकांनी सलग तिस-या दिवशी मागील नफ्याची पातळी ओलांडत सकारात्क स्थिती गाठली. आजचा नफा बहुतांशरित्या फार्मा सेक्टरच्या नेतृत्वाखाली झाला. निफ्टी ०.५०% किंवा ५६.१० अंकांनी वाढून ११,२७० अंकांवर बंद झाला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.३७% किंवा १४१.५१ अंकांनी वाढला व ३८,१८२.०८ वर थांबला.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात १७२३ शेअर्सनी नफा कमावला, १६६ शेअर्स स्थिर राहिले तर ९९६ शेअर्सनी घट अनुभवली. सिप्ला (९.४८%). एलअँडटी (४.८४%), एमअँडएम (४.९०%), टाटा मोटर्स (३.७५%) आणि सन फार्मा (३.४५%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर आयशर मोटर्स (२.१९%), एशियन पेंट्स (१.३%), मारुती सुझुकी (१.२०%), बीपीसीआय (१.१७%) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (१.१६%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. आज फार्मा, आयटी, एफएमसीजी, बँक आणि ऑटो क्षेत्रासह सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात स्थिरावले. बीएसई स्मॉलकॅप १.४७% नी वाढला तर बीएसई मिडकॅप १.४२% नी वधारला.
आयपीसीए लॅबोरेटरीज: कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात २४५% ची मजबूत वाढ दर्शवली. तसेच कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल ४२% नी वाढला. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ७.२५% नी वाढले व त्यांनी २,०९८ रुपयांवर व्यापार केला.
कोचिन शिपयार्ड लिमिटेड: कंपनीने २०२१ या वर्षातील पहिल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ६५% ची घट दर्शवली. तरीही कंपनीचे स्टॉक्स ३.६०% नी वाढले व त्यांनी ३४३.८० रुपयांवर व्यापार केला. कंपनीचा या काळातील महसूल ५५% नी वाढला.
महिंद्रा अँड महिंद्रा: कंपनीच्या २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहितील ट्रॅक्टर बिझनेसमधील उत्पन्न चांगल्या स्थितीत झाले. परिणामी आजच्या व्यापारी सत्रात कंपनीचे स्टॉक्स ४.९०% नी वाढले व त्यांनी ६२९.९० रुपयांवर व्यापार केला.
सिप्ला लिमिटेड: २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीने अपेक्षेपेक्षा मजबूत उत्पन्न झाल्याचे नोंदवले. कंपनीचा जून २०२० च्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा २६.६% झाला. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ९.४८% नी वाढले व त्यांनी ७९७.७० रुपयांवर व्यापार केला.
इमामी लिमिटेड: कंपनीचा २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहितील निव्वळ नफा १.१७% नी वाढला. तसेच ऑपरेशन्समधील महसूल २५.७९% नी घसरला. कंपनीचे स्टॉक्स २०% नी घसरले व त्यांनी ३०८.७५ रुपयांवर व्यापार केला.
भारतीय रुपया: आजच्या व्यापारी सत्रात देशांतर्गत इक्विटी बाजारात खरेदी दिसून आल्याने रुपया सकारात्मक स्थितीत होता. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने ७४.८९ रुपयांचे मूल्य कमावले.
जागतिक बाजार: आजच्या सत्रात युरोपियन बाजारात खरेदी दिसून आल्याने सकारात्मक व्यापार झाला. एफटीएसई १०० ने ०.५३% ची वृद्धी घेतली तर एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.५६% नी वाढले. तथापि आशियाई बाजारात आजच्या व्यापारी सत्रात नकारात्मक स्थिती दिसून आली. नॅसडॅकने ०.८७% ची घसरण, निक्केई २२५ ने ०.३९% ची घसरण अनुभवली. तसेच हँगसेंगनेही ०.६३% ची घसरण घेतली.
टिप्पणी पोस्ट करा