मुंबई, २९ सप्टेंबर २०२०: अमेरिकेच्या डॉलरचे मूल्य घसरल्याने सोने आणि बेस मेटलच्या किंमतींना आधार मिळाला. अमेरिकी डॉलरमध्ये घट झाल्याने तांब्याचे दर लाल रंगात दिसून आले. थापि, कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत नव्याने वाढ झाल्याने जागतिक बाजारातील नफ्याला मर्यादा आल्या. कोव्हिड-१९च्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने तसेच जागतिक मागणी घटल्याने क्रूड तेलाचे दरही खालावले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
सोने: अमेरिकेच्या डॉलरचे मूल्य घसरल्याने स्पॉट गोल्डचे दर १.१२% नी वाढले व १८८८०.९ डॉलर प्रति टनांवर बंद झाले. तथापि, चीनने वृद्धीच्या आकडेवारीत प्रचंड सुधारणा दर्शवल्याने पिवळ्या धातूतील नफा मर्यादित राहिला. मार्च २०२० पासून सोन्याने सर्वोच्च साप्ताहिक घसरण अनुभवली. अमेरिकेच्या चलनात सुधारणा झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेल्या सोन्याचे दर कमी झाले.
कोव्हिड-१९ च्या रुग्णांमध्ये धोकादायक पद्धतीने वाढ होत असल्याने गुंतवणुकदारांमध्ये आर्थिक सुधारणांबाबतच्या आशाही मावळत आहेत. त्यामुळे पिवळ्या धातूतील किंमतीतील घसरणीला मर्यादा आल्या. परिणामी, गुंतवणुकदार सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याकडे आकर्षित होत राहिले.
कच्चे तेल: डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ०.८७% नी घसरले व ४.६ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाले. अमेरिकेचे खासदार आणि व्हाइट हाऊसमधील अधिकाऱ्यांदरम्यान झालेल्या नव्या प्रोत्साहनपर मदतीच्या आशेने क्रूडला आधार दिला. मात्र साथीच्या विस्तारत जाणाऱ्या परिणामामुळे क्रूडच्या मागणीत सातत्याने घट होत आहे. कोव्हिड-१९च्या नव्याने आलेल्या लाटेमुळे जागतिक तेल बाजार घटला. तसेच विविध अर्थव्यवस्थांमध्ये पुन्हा लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चिंता वाढल्या. परिणामी क्रूडच्या अर्थकारणावरही परिणाम झाला. पेट्रोलियम निर्यात संघटना (ओपेक)ने उत्पादनात कपात करूनही, लिबिया आणि इराणने तेल निर्यात वाढवली आहे. परिणामी कच्च्या तेलाचे दर आणखी खालावले. कमकुवत अर्थव्यवस्थेमुळेदेखील तेलाच्या दरांवर आणखी नकारात्मक परिणाम झाले.
बेस मेटल्स: अमेरिकी डॉलरचे अवमूल्यन झाल्याने एलएमईवर बेस मेटल सकारात्मक स्थितीत बंद झाले. चीनच्या औद्योगिक क्षेत्रातील वृद्धी तसेच अमेरिकेच्या धोरणकर्त्यांनी आणखी प्रोत्साहनपर मदतीची आशा दर्शवल्याने औद्योगिक धातूंना आणखी आधार मिळाला. साथीनंतर चीनची आर्थिक वृद्धी आणि मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहनपर उपाययोजनांमुळे बेस मेटलच्या दरांना अधिक बळकटी मिळाली. मार्च २०२० मध्ये हे दर सर्वात कमी नोंदण्यात आले होते. तथापि, दीर्घकालीन आर्थिक सुधारणेच्या संकेतामुळे या नफ्याबाबतही सावधगिरी बाळगली जात आहे. इंटरनॅशनल निकेल स्टडी ग्रुपने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जागतिक निकेल बाजारपेठ जुलैमध्ये ८,९०० टनांपर्यंत घसरली. जून २०२० मध्ये ती १४,७०० टनांवर होती.
टिप्पणी पोस्ट करा