डॉलरमध्ये सुधारणा; सोन्याच्या दरात घट


मुंबई - डॉलरच्या मूल्यात सुधारणा व जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने सोन्याच्या दरात घसरण झाली. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की सोने ०.५३% नी घसरून १,८६७.१ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. अमेरिकी डॉलरमध्ये सुधारणा झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेल्या सोन्याकडे इतर चलन धारकांनी काहीसे दुर्लक्ष केले. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने म्हटले की, कोरोना विषाणू मदत निधीबाबतचा करार नोव्हेंबर २०२० मधील अध्यक्षीय निवडणुकीनंतरच होईल.


अमेरिकेतील कामगार बाजारात मंदी असूनही अर्थव्यवस्था २०२० च्या तिस-या तिमाहीत चांगल्या गतीने सुधारत आहे. यावरून सरकराने मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहनपर मदत केल्याचे दिसून येते. त्यामुळेही पिवळ्या धातूच्या मागणीवर काहीसा नकारात्मक परिणाम झाला.


तथापि, अमेरिका, युरोप आणि जगातील अन्य महत्त्वाच्या भागात नव्याने कोरोनाची लाट आल्याने अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान अनिश्चिततेचे वातावरण आहे. याचा परिणाम म्हणून सुरक्षित मालमत्ता समजल्या जाणा-या सोन्याचे आकर्षण वाढून नुकसान काही प्रमाणात कमी झाले. अमेरिकेच्या अतिरिक्त मदतनिधीबाबतच्या अनिश्चिततेमुळे डॉलरला काहीसा आधार मिळाला. त्यामुळेही सोन्याचे दर आणखी कमी झाले. आजच्या सत्रात एमसीएक्सवर सोन्याचे दर घटण्याची शक्यता आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने