~ ६५ ते ७५ दशलक्ष पॅकेज पोहोचवण्यासाठी सज्ज~
मुंबई, १ ऑक्टोबर २०२०: भारतातील अग्रणी पुरवठा साखळी सेवा प्रदाता डिलिव्हरी ही कंपनी येत्या सणासुदीच्या काळात ६५ ते ७५ दशलक्ष पॅकेज पोहोचवण्यासाठी सज्ज आहे. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास १०० टक्के आहे. सणासुदीच्या काळात, पुढील काही आठवड्यात १५,००० हंगामी नियुक्त्या करण्याचे डिलिव्हरीचे उद्दिष्ट आहे. सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर्स, पिकअप, हब, सर्व्हिस सेंटर अशा नियुक्त्या केल्या जातील.
यासोबतच, कंपनी तिचे विविध भागीदारी कार्यक्रम, ऑन-बोर्डिंग वैयक्तिक दुचाकीस्वार, ट्रान्सपोर्टर्स, स्थानिक किराणा आणि व्यावसायिकांच्या माध्यमातून शेवटच्या मैलापर्यंत माल पोहोचवण्याची क्षमता वाढवत आहे. भारतभरात २५,००० पेक्षा जास्त पार्टनर साइन-अप्स वाढवण्याची कंपनीची योजना आहे, जी सध्याच्या बेसपेक्षा दुप्पट आहे. या हंगामातील लास्ट माइल पार्टनर्सना १०० कोटीपेक्षा जास्त महसूल भरणा कंपनीने दिला. १२,००० पेक्षा जास्त व्यवसाय आणि व्यक्तींनी आधीच डिलिव्हरीशी भागीदारी केलेली आहे.
डिलिव्हरीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य व्यवसाय अधिकारी संदीप बारसिया म्हणाले, ‘ आम्ही जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी सतत महत्त्वपूर्ण गुंतवणूक करत आहोत. एकूणच, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बिलासपूर, भिवंडी आणि बंगलोरमध्ये मेगा ट्रकिंग टर्मिनल सुरू करण्यासह मागील वर्षभरात आमचे फिजिकल फुटप्रिंट १२ दशलक्ष चौरस फुटांवर गेला आहे. आमच्या मूळ योजनेच्या अनुषंगगाने आम्ही पुढील १८ ते २४ महिन्यांमध्ये विस्तारण्यासाठी ३०० कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक करणार आहोत. याद्वारे आमची साधने वाढवू तसेच आणखी मेगा ट्रकिंग टर्मिनल्स वाढवू.”
टिप्पणी पोस्ट करा