अमृता फडणवीस म्हणाल्या, माझ्याकडे ना घर, ना दार; मग काय उखडणार बुल्डोजर सरकार?




मुंबई - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. माझ्याकडे ना घर, ना दार; मग काय उखडणार बुल्डोजर सरकार? असे ट्वीट करून अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे. 


राज्यातील मंदिरे सुरू करण्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापलेले आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगदसिंह कोश्यारी यांच्या याविषयावरुन चांगलाच 'सामना' रंगला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत त्यांच्यावर टीका केली होती. या टीकेला शिवसेनेने उत्तर दिले होते. आता यावर अमृता फडणवीसांनी शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला आहे. फिर क्या उखाडेगी बुलडोजर सरकार? असा खोचक सवाल अमृता फडणवीसांनी केला.


अमृता फडणविसांनी ट्विट करत शिवसेनेला डिवचल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी म्हटले की, 'माझ्याकडे ना घर, ना दार; मग काय उखडणार बुल्डोजर सरकार' असा प्रश्न अमृता फडणवीसांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटरवर ट्वीट करत त्यांनी हा सवाल उपस्थित केला.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने