सोने, कच्चे तेल आणि बेस मेटलचे दर घसरले
मुंबई, कोरोना विषाणू मदत निधी म्हणून अमेरिकेकडून मिळणाऱ्या मदतीच्या अनिश्चिततेमुळे सोने आणि कच्च्या तेलाच्या दरांवर परिणाम झाला. चीनमधील औद्योगिक कामकाजात वाढ झाल्यानेही सोन्याचे दर उतरले. अमेरिकेतील तेल उत्पादन प्रक्रियेत सुधारणा झाल्याने पुरवठा वाढला, मात्र मागणी कमकुवत असल्याने तेलाच्या दर आणखी घसरले. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले कि चीनमधील निर्यात वृद्धी आणि औद्योगिक प्रक्रिया वाढल्याने मागणीतही वाढ झाली व परिणामी बेस मेटलचे दर वधारले.
सोने: सोने ०.४% नी घसरले व १९२१.९ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. अमेरिकेच्या मदतीची कमी शक्यता असल्याने पिवळ्या धातूच्या किंमतीवर परिणाम झाला.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कोरोनाविषाणूची मदत मर्यादित स्वरुपातच मागितल्याने सुरक्षित मालमत्ता समजल्या जाणाऱ्या सोन्याच्या व्यापारावर उदासीन परिणाम झाला. महागाई आणि चलन अवमूल्यन रोखण्यात सोन्याची भूमिका मोठी असते. व्हाइट हाऊसमधील अधिकारी आणि डेमोक्रेट्स या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्वसमावेशक विधेयकाद्वारे प्रयत्न करत आहेत.
सप्टेंबर २०२० मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा झाल्याने विदेशातील मागणी वाढली तसेच सुधारणेतही संतुलन आले. यामुळे गुंतवणुकदारांमध्ये जोखिमीची भूक वाढली व सोन्याच्या दरांवर दबाव आला.
अतिरिक्त कोरोना विषाणू मदतीबाबत अनिश्चितता तसेच डॉलरचे मूल्य वधारल्याने सोन्याचे दर घसरले.
कच्चे तेल: अमेरिकेतील तेल उत्पादनाची प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याने डब्ल्यूटीआय क्रूडचे दर २.८% नी घसरले व ते ३९.४ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. यासोबतच कोरोनासाठीचा मदत निधी मिळवण्याची शक्यता कमी असल्यानेही तेलाचे दर घसरले.
अमेरिकेत डेल्टा चक्रिवादळामुळे मेक्सिको खाडीतील उर्जा उत्पादनातील जोखीम या आठवड्याच्या अखेरीस कमी झाली. परिणामी तेलाचे दर आणखी खाली उतरले.
लिबियातील सर्वात मोठ्या तेल क्षेत्रातील कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्याने जागतिक तेल पुरवठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तथापि, मागणीतील घसरण ही चिंताजनक बाब अजून कायम आहे.
कोव्हिड-१९ रुग्णसंख्येतील वाढ आणि जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांवर लॉकडाऊनचे संकट कायम असल्याने तेलाच्या दरांवर आणखी नकारात्मक परिणाम झाला.
बेस मेटल्स: एलएमईवरील बेस मेटलचे दर वाढलेल्या मागणीमुळे हिरव्या रंगात दिसून आले. चीनमधील संतुलित सुधारणेमुळे जागतिक चिंता धुसर झाली तसेच औद्योगिक धातूंनाही आधार मिळाला.
सप्टेंबर २०२० मध्ये चीनच्या औद्योगिक कामकाजात दमदार वाढ झाल्याने विदेशी मागणीतही वाढ झाली. तसेच प्रोत्साहन समर्थित पायाभूत सुविधांमधील वृद्धीमुळे बेस मेटलचे दर वधारले.
चीनची निर्यात सलग चौथ्या महिन्यात वाढलेली दिसून आली. तसेच साथीनंतर अनेक आर्थिक प्रक्रियांमध्ये सुधारणा झाला. तथापि, अमेरिकेकडून कमीत कमी मदत निधी मिळण्याच्या आशेने आणि कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे औद्योगिक धातूंच्या अर्थकारणावर परिणाम दिसून आला.
तांबे: अमेरिकेतील डॉलरच्या मूल्यात सुधारणा झाल्याने एलएमईवरील तांब्याचे दर ०.३८% नी वाढले व ते ६७३७.५ डॉलर प्रति टनांवर स्थिरावले. तसेच अमेरिकेकडून मिळणाऱ्या मदतनिधीबद्दल कमी आशा असल्याने लाल धातूंचे दर आणखी कमी झाले. चीनच्या औद्योगिक कामकाजात वेगाने सुधारणा झाल्याने औद्योगिक धातूंना थोडा आधार मिळण्याची शक्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा