फायझार कंपनीची कोरोना वॅक्सीन ९० टक्के यशस्वी

पण भारतासाठी ही लस खरेदी करणे आहे, एक मोठे आव्हान 




नवी दिल्ली -अमेरिकन कंपनी फायझरच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातली चाचणी ९० टक्के यशस्वी झाली आहे. पण ही  वॅक्सीन खूपच थंड वातावरणात  ठेवावी लागते. यासाठी कोल्ड स्टोरेज लागतं. कोल्ड स्टोअरची यंत्रणा भारतभर पोहोचवणं हे मोठे आव्हान आहे. 


 गेल्या अनेक महिन्यांपासून जग कोव्हिडशी झुंजत आहे पण आता अमेरिकन कंपनी फायझार कंपनीने एक लस निर्माण करुन ती कोरोना विषाणूवर 90 टक्क्यांपर्यंत प्रभावशाली ठरणार असल्याचे म्हणत सगळ्यांनाच दिलासा दिला आहे.  परंतु WHO विश्व आरोग्य संघटनाच्या सर्वेनुसार कमी विकसित देशांना ही लस खरेदी करणे परवडणारच नाही. कारण या वॅक्सीनची जपणूक करण्यासाठी कोल्ड स्टोअरेजची सुविधा असणे खूप गरजेचे असते. 


य़ुनिसेफ येत्या वर्षापर्यंत सुमारे एक अब्ज लसी व त्यासंबधित वस्तूंची तयारी करण्यात मग्न आहे, याशिवाय कोव्हिडची लस जगात आल्यानंतर ती अन्य देशांमध्ये पाठवण्याची सोयही य़ुनिसेफ करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हे लसीचे काम जागतिक पातळीवर करता येण्यासाठी WHO कोणतीही कसर सोडत नाही तरीही WHO  च्या क्षेत्रिय कार्यालयाने विकसनशील देशांबाबत जी शंका उपस्थित केली त्याकडेही दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.


AIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही याबाबतीत चिंता व्यक्त करताना म्हंटले आहे की, भारतासारख्या विकसनशील देशांत व प्रामुख्याने ग्रामीण भागात कोव्हिड लसीचे जतन करणे, पोहोचवणे हे मोठे आव्हान ठरु शकते. याशिवाय डॉ. जुगल किशोर हे देखील असे म्हणतात की, भारतासारख्या कोणत्याही देशासाठी कोव्हीडची लस व त्यासंबंधित काम अत्यंत आव्हानात्मक असणार आहे. लस खरेदी करण्यापूर्वीच भारताला त्याची देखभाल व संबंधित उपकरणे व वस्तू खरेदी कराव्या लागणार अथवा देशातच तयार करणे भाग ठरु शकते.


दरम्यान त्यासाठी सुरुवातील देशपातळीवर मोठ्या प्रमाणात याची ट्रायल घेतली जाईल त्याला बराच वेळ लागू शकेल शिवाय लसीचे जतन करण्यासाठी -70 अंश तापमानात ठेवण्यास बाहेरुन उपकरणे मागवावी लागणार व ते खूपच महागात पडेल, कारण आधीच कोव्हिडच्या परिणामांमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे, त्यामुळे सरकारलाही एकूणातच सर्व कठिण जाईल.


 डॉ. किशोर यांच्या म्हणण्यानुसार भारताने समजा ही लस खरेदी करण्याची जोखीम पत्करली तरी भारताच्या तापमानात किती काळ टिकू शकते ते पहावे लागेल कारण भारतात वापरल्या जाणाऱ्या लसी साधारण चार ते सहा तासांत वापरल्या जातात आणि फायझरच्या लसीसाठी भारताला अनेक स्तरांवर व्यापकपणे काम करावे निश्चितच लागेल.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने