अजूनही ट्रम्प यांना पराभव नामंजूर


नुकतेच अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणकीचा निकाल समोर आलाय आणि बायडन यांनी भरघोस मतांनी ट्रंप यांचा दणदणीत पराभव केल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु विद्यमान राष्ट्राध्यक्ष हा पराभव स्वीकारण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. ट्रम्प यांनी पेंटागनमध्ये नुकतेच अनेक बदल केले आहेत.


यापाठोपाठ अमेरिकेत अशी चर्चा रंगली आहे की ट्रम्प आता सत्ताबदलाची तयारी करत आहेत. कारण ट्रम्प यांनी लगेचच पेंटागॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यातही सर्वात आधी संरक्षण मंत्री एस्पर यांना पदावरून हटवलेले आहे, ट्रम्प हे असेही एस्पर यांच्या कार्यप्रणालीवर तितकेसे खूश नव्हते असे म्हटले जाते. व त्यांच्या जागी राष्ट्रीय आतंकवाद विरोधी केंद्राचे निर्देशक क्रिस्टोफर मिलर यांची नियुक्ती केली आहे. 


याशिवाय पेंटागॉनचे कार्यवाहक नितीप्रमुख जेम्स एंडरसन यांनाही पदच्युत केले असून त्याच्या ठिकाणी ओबामांना आतंकवादी म्हणणाऱ्या अधिकाऱ्याची म्हणजेच एंथनी टाटची नियुक्ती केलेली आढळते, जे आपल्या खळबळजनक विधानांबाबत नेहमीच चर्चेत असतात. एंथनी रिपब्लिकनचे कट्टर समर्थक असून ते ट्रम्प यांचे खास माणूस असल्याचे म्हंटले जाते.


ट्रम्प यांच्या पुतणीनेही अमेरिकेतील सत्त्पालटाबाबत ट्विट करताना सांगितले आहे की, जो बायडन राष्ट्राध्यक्ष  पदाची निवडणूक वैध व निर्णायकपणे जिंकलेले आहेत, जरी डोनाल्ड ट्रम्पचे समर्थक कितीही  अफवा पसरवत असले तरी वास्तविकता कुणी बदलू शकणार नाही. सतर्क असायला हवे कारण हा सत्तापालट होणे महत्त्वाचे आहे.


दरम्यान ट्रम्प यांच्या कडून वारंवार राष्ट्राध्यक्ष निवडणूकीबाबत गोंधळ झाल्याचे म्हटले जात आहे तसेच जो बायडन यांच्या विजयावरही शंका निर्माण केली आहे. तर एकीकडे विदेश मंत्री पोंपियोंचे म्हणणे असे आहे की, सत्ताबदल अतिशय शांततेने करण्यात येईल व ट्रम्प आपला दुसरा कार्यकाळ त्वरित सुरू करणार आहे.


तसेच जो बायडन म्हणतात की, ट्रम्प यांनी पराभव न पत्करणे ही लाजिरवाणी बाब आहे. यामुळे राष्ट्राध्यक्ष पदाचाही एकप्रकारे अवमानच होत आहे. मला अशी आशा आहे की, अमेरिकेची जनता समजूतदार आहे व 20 जानेवारी पर्यंत सगळे सुरळित होईल आणि सत्तापालटाचा सगळे स्वीकार करतील.


 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने