नवशिक्या लोकांना शेअर बाजार ही सहजपणे पैसे कमावण्याची जागा आहे, असे वाटते. पण हे क्वचितच खरे ठरू शकते. शेअर बाजार जटिल घटकांद्वारे नियंत्रित केला जातो. बाजारातील मूलतत्त्वे समजून घेण्यास बराच काळ लागतो. एक गुंतवणूकदार म्हणून बाजार कसे काम करतो, हे तुम्ही योग्य रितीने समजून घेतले पाहिजे. त्यानंतर तुमच्या गुंतवणुकीच्या स्थितीचे मूल्यांकन करावे, मग ती अल्पकालीन असो वा दीर्घकालीन. यासोबतच तुम्ही तुमची वैयक्तिक जोखिमीची भूक समजून घेतली पाहिजे. शेअर बाजारात व्यापार करत असतानाच आपण किती पैसे गमावू शकतो, हेही स्पष्ट हवे. बाजारातील अस्थिर टप्प्यांमध्ये भावनांचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन करताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे सीएमओ श्री प्रभाकर तिवारी.
नुकसान अपरिहार्य आहे, हे समूजन घ्या: तुमचा गुंतवणुकीचा प्रवास सुरु करण्यापूर्वी स्टॉक मार्केटमध्ये नुकसान अटळ आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. अगदी अनुभवी आणि प्रसिद्ध गुंतवणूकदारांनीही त्यांच्या आयुष्यात कधी तरी मोठे नुकसान झेलले आहे. असे धक्के बसल्यानंतरही त्यांनी संयम सोडला नाही आणि पळ काढला नाही. अखेरीस ते विश्वासासह परत आले. एक गुंतवणूकदार म्हणून, आणखी एक घटक समजून घेतला पाहिजे. तो म्हणजे, नुकसान अटळ असले तरी विवेकी गुंतवणुकीचे निर्णय घेत आपल्याला जोखीम कमी करता येते. याचाच अर्थ असा की, तुमच्या कष्टाची कमाई कंपन्यांच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये गुंतवणे. वाढीची शक्यता वर्तवणाऱ्या कंपन्यांबाबत आपण नेहमी शून्य भावना ठेवली पाहिजे. वैविध्यपू्र्ण स्टॉक पोर्टफोलिओद्वारे याची सुनिश्चिती होते की, तुम्ही प्राधान्य दिलेल्या स्टॉकनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी नाही केली, त्यांनी दयनीय कामगिरी केली तरी आपल्याकडे तोटा भरून काढण्यासाठी उर्वरीत भाग आहे. दुस-या शब्दात सांगायचे झाल्यास, आपलला गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ तयार करताना, आपण नेहमीच रिस्क टू रिवार्ड गुणोत्तर साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासह तुमच्याकडे योग्य भांडवल व्यवस्थापन धोरणदेखील असावे. दीर्घकाळ भांडवलाचे संरक्षण केल्याने नुकसान कमी करण्यात मदत होईल. एकूणच, नफा आणि तोटा हा या खेळाचा भाग असला तरी आपण संतुलन साधत जोखीम करू शकतो.
स्टॉक मार्केटच्या बुडबुड्यात अडकू नका: शेअर बाजारातील भावनिक उलथापालथींचे व्यवस्थापन करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे शेअर बाजाराच्या बुडबुड्यात न अडकणे. हा बुडबुडा म्हणजे बाजारा अतार्किक आशावादात अडकण्यासारखे आहे. या दिखाव्यात असे चित्र दिसते की, ज्या शेअरची कामगिरी चांगली दिसते, त्यावरच लोक विश्वास ठेवण्यास सुरुवात करततात. स्टॉक मार्केटच्या या बुडबुड्यात एक चक्र असते. त्याचा वेगाने विस्तार होत असतो आणि नंतर आकुंचन पावण्यातच त्याचा शेवट होतो. या बुडबुड्याच्या स्थितीत गुंतवणूकदारांकडून प्रचंड खरेदी केली जाते. मोठ्या प्रमाणावर त्वरीत नफा मिळवण्याचा एकमेव हेतू ठेवत बहुतांश गुंतवणूकदार स्टॉक खरेदी करतात , त्यामुळे या स्टॉक्सची टंचाई निर्माण होते. अशा स्थितीत स्टॉकच्या किंमती उच्चांक गाठतात. लक्षात ठेवा, स्टॉकच्या किंमतीत वेगाने होणारी वाढ ही कंपनीच्या मूलभूत मूल्यवाढीविना होणारी वाढ आहे. काही काळानंततर, गुंतवणूकदारांना कळते की, त्या स्टॉकमधील वाढ ही व्यवहारिक कारणांशिवाय होती, त्यामुळे ते स्टॉक विक्री सुरु करतात. शेअर बाजारातील बुडबुड्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे समूहाची मानसिकता पुन्हा एकदा दिसून येते. गुंतवमूकदार तत्काळ त्यांचे स्टॉक्स विकायला सुरुवात करतात. पण या वेळी मात्र बाजार घसरायलला सुरुवात होतो. अनेक गुंतवणुकदारांना मोठे नुकसान झेलावे लागते. बाजार पुन्हा सुधारायला सुरुवात होते तेव्हा बुडबुड्यातील हवा जाऊ लागते किंवा तो फुटतो. शेअर बाजाराचा बुडबुडा फुटल्याने बाजाराचे अवमूल्यन किंवा प्रचंड घसरण दिसून येते. गुंतवणुकदारांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागत असताना बाजारातील सुधारणेचा दर प्रचंड कमी आहे. अशा प्रकारे, एक गुंतवणूकदार म्हणून, या बुडबुड्यापासून आपले संरक्षण करणे आवश्यक आहे. तसेच तर्कसंगत संयम कायम राखला पाहिजे.
मूलतत्वांवरील व्यापार: स्टॉक्सच्या किंमती एका रात्रीत बदलू शकतात, परंतु कंपनीच्या मूलभूत गोष्टी काही तासात बदलू शकत नाहीत. मूलभूतरित्या मजबूत कंपन्यांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास आपल्याला या भावनिक खेळात अडकण्याची भीती नसते. एखाद्या कंपनीच्या सामर्थ्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आपण बाजारात स्वसमावेशक संशोधन केले पाहिजे. कोणत्याही कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही मुख्य मापदंड लक्षात घेतली पाहिजेत. यात भांडवलीकरण, उत्पन्न वृद्धी, निव्वळ नफा, कर्ज ते इक्विटी गुणोत्तर, किंमत ते उत्पन्न गुणोत्तर, लाभांश देणे, स्टटॉक स्प्लिट्स, विलीनीकरण आणि अधिग्रहण इत्यादींचा समावेश होतो. एक लक्षात घ्या की, कंपनीच्या स्टॉकची किंमत ही कंपनीच्या अंतर्गत मूल्यांद्वारेच ठरत असते. मजबूत मूलतत्त्वे असलेल्या कंपनीवरही शेअर बाजारातील उलथापालथीचा परिणाम होऊ शकतो, परंतु अखेरीस ती तिची शक्ती आणि स्थान पुन्हा मिळवते.
टिप्पणी पोस्ट करा