विक्रमी उच्चांकानंतर भारतीय निर्देशांक घसरले

 



मुंबई - अत्यंत तेजीनंतर गुंतवणुकदारांनी नफा बुक केल्याने बेंचमार्क निर्देशांक उच्चांकी पातळीवरून १.५ टक्क्यांनी घसरला. सर्व क्षेत्रांमध्ये बँकिंग आणि वित्तीय स्टॉक्सनी बाजार सर्वाधिक खाली आणला. निफ्टी १.५१% किंवा १९६.७५ अंकांनी घसरला व १२,८५८.४० अंकांवर स्थिरावला. तरीही निफ्टीने १२,००० च्या पातळीवर उंची गाठणण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे सेन्सेक्स १.५६% किंवा ६९४.९२ अंकांनी घटला व ४३,८२८.१० अंकांवर स्थिरावला.


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात ओएनजीसी (५.९१%), गेल (१.६५%), एसबीआय लाइफ (१.३२%), अदानी पोर्ट्स (१.४४%) आणि कोल इंडिया (०.४९%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर आयशरर मोटर (३.७२%), अॅक्सिस बँक (३.४४%), कोटक बँक (२.९७%), सन फार्मा (२.५३%) आणि बजाज फायनान्स (२.४३%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.


निफ्टी बँक आणि निफ्टी फिन सर्व्हिसेसमध्ये १.८% ची घट झाली तर निफ्टी ऑटो आणि निफ्टी आयटी सेक्टरने प्रत्येकी १.५% घसरण अनुभवली. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅपने अनुक्रमे १.७५% आणि १.१२% ची घट दर्शवली.


अरबिंदो फार्मा लि.: अमेरिकन एफडीएने अरबिंदो फार्मा कंपनीच्या न्यू जर्सी युनिटला नोटीस दिल्यानंतर कंपनीचे स्टॉक्स २.९०% नी घसरले व त्यांनी ८५३.७५ रुपयांवर व्यापार केला. कंपनीच्या पद्धती, सुविधा, उत्पादन आणि प्रक्रिया सीजीएमपीला अनुकूल नसल्याचे सांगत हा इशारा देण्यात आला.


युनियन बँक ऑफ इंडिया लि.: बँकेने डिबेंचर्सच्या स्वरुपात बेसल III कंप्लिअंट टीअरII बाँड्स देण्याची योजना जाहीर केली. त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडियाचे स्टॉक्स ३.३१% नी वाढले व त्यांनी २६.५५ रुपयांवर व्यापार केला.


ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लि.: ओएनजीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये ५.९१% नी वाढ झाली व त्यांनी ८०.६० रुपयांवर व्यापार केला. तेलाच्या दरात सुधारणा होऊन मार्च २०२० नंतर त्यांनी उच्चांक गाठला. त्यानंतर हे बदल दिसून आले. कोव्हिड-१९ लसीच्या आशेमुळे कच्च्या तेलाचे दर वाढले.


लार्सन अँड टुब्रो लि.: एलअँडटी लिमिटेड कंपनीचे स्टॉक्स १.६१% नी घटले व त्यांनी १,११७.२० रुपयांवर व्यापार केला. कंपनीने भारतातील सर्वात मोठा रस्ता पूल बांधण्याचा करार केल्यानंतरही हे परिणाम दिसले. या कराराची किंमत २५००-२५०० कोटी रुपये आहे.


भारतीय रुपया: देशांतर्गत इक्विटी बाजारात विक्री दिसून आल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने ७३.९९ रुपये मूल्य गाठले.


जागतिक बाजार: कोव्हिड-१९ लसीवरील वाढत्या आशेमुळे आजच्या सत्रात जागतिक बाजारात सकारात्मक संकेत दिसून आले. नॅसडॅक १.३१%, एफटीएसई एमआयबी ०.३३%, निक्केई २२५ ने ०.५०%, हँगसेंगने ०.३१% ची वृद्धी घेतली तर एफटीएसई १०० कंपनीचे शेअर्स ०.५० टक्क्यांनी घसरले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने