मुंबई - डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ४.३ टक्क्यांनी वाढले व ते ४४.९ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. दुस-या संभाव्य लसीच्या आशावादामुळे तसेच अमेरिकेचे निवडून आलेले अध्यक्ष जो बिडेन यांच्या हस्तांतरणामुळे जागतिक अर्थकारणाला आधार मिळाला.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की ओपेककडून पुढील काही महिन्यात अधिक कठोर उत्पादन कपातीच्या अपेक्षेनेही तेलाच्या दरांना आणखी आधार मिळाला. कटग्रस्त तेल बाजारातील मागणीत सुधारणा दिसून आल्यास जानेवारी २०२१ पर्यंत उत्पादनातील नियोजित घट मागे घेतली जाईल. ऑक्टोबर २०२० मध्ये संपूर्ण अमेरिका आणि युरोपीय बाजारपेठेत नोंदवल्या गेलेल्या मजबूत आर्थिक सुधारणेमुळे बाजारपेठेत आणखी एक सकारात्मक संकेत मिळाला. कोरोना विषाणूविरोधात संभाव्य लसीमुळे डॉलरचे अवमूल्यन झाल्यानेही तेलाच्या दरांना आधार मिळाला.
एलएमईवर बेस धातूंनी सकारात्मक स्थिती गाठली. या समूहात निकेलने सर्वाधिक उच्चांक गाठला. चीनकडून वाढती मागणी, डॉलरचे अवमूल्यन आणि लसीच्या उत्साहामुळे औद्योगिक धातूचे दर वाढले. अमेरिकेतील ऑक्टोबरमधील रोजगाराच्या आकडेवारीत सुधारणेनंतर सेवा व उत्पादन कामकाज वाढले हे सुचित झाले. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत संतुलित सुधारणा होत असल्याने बाजारातील भावनांनाही आधार मिळाला.
इंटरॅनशनल लीड अँड झिंक स्टडी ग्रुप (आयएलझेडएसजी) अहवालानुसार, सप्टेंबर २०२० मध्ये जागतिक झिंक बाजाराचे सरप्ल ३३,१०० टन झाले. ऑगस्ट२०२० मध्ये ते ३१,५०० एवढे होते. २०२० च्या पहिल्या ९ महिन्यांत झिंक बाजाराचे सरप्लस ४३७,००० टनांवर पोहोचले. मागील वर्षी याच काळातील तूट १९७,००० टन होती.
टिप्पणी पोस्ट करा