ईडीला चौकशीसाठी सहकार्य करणार- सरनाईक
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) कार्यालयात दाखल झाले आहेत. प्रताप सरनाईक यांनी ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानुसार गुरुवारी ते ईडी कार्यालयात हजर झाले असून चौकशीला सुरुवात झाली आहे.
२४ नोव्हेंबरला सरनाईक यांच्या विरोधात कंपनीमध्ये काही गैरव्यवहार झाल्याचे आढळल्यामुळे त्यांच्या ठाणे, मुंबई येथील घर आणि कार्यालयावर ईडीने छापे टाकले या संदर्भात चौकशीसाठी दोन वेळा बजावलेल्या नोटीसवर सरनाईक यांनी दुर्लक्ष केले होते .मात्र आज ते आज ईडी कार्यालयात हजर झाले आहेत.
परवा त्यांनी सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले होते, त्यानंतर पत्रकाराशी बोलताना म्हणाले होते की , मी कोणताही गुन्हा केलेला नाही आहे त्यामुळे मी या चौकशी ला सामोरे जाणार आहे, असे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले. मला केंद्र आणि राज्य सरकारच्या संघर्षामधील तानाजी मालुसरे बनवण्याचा प्रयत्न केला केला जात आहे. परंतु मी २१ व्या शतकातील तानाजी मालुसरे आहे.
दरम्यान, प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा आहे. तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे ईडीला निर्देश दिले आहेत. ईडीच्या कारवाई विरोधात सरनाईकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती अन्य एका प्रकरणासोबत सरनाईकांचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तूर्तास कारवाई न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
अभिनेत्री कंगना रानौत आणि रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्यावर सरनाईक यांनी अनेक आरोप केले आहेत. कंगनाची ड्रग्स सेवन केल्याबद्दल चौकशी झाली पाहिजे तर मुख्यमंत्र्यांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याबद्दल अर्णब गोस्वामीला अटक करून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर ईडीने सरनाईक यांच्या घर आणि ऑफिसवर छापे मारल्याने राजकारण ढवळून निघाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा