मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात बदनामीकारक वृत्त प्रसिद्ध केल्याबद्दल 'जय महाराष्ट्र' या वृत्तवाहिनीच्या संपादक आणि भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
पुणे येथे शरद पवार यांनी दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ रोजी एका कार्यक्रमात जनतेशी संवाद साधला होता मात्र पवारसाहेब जे बोलले नाही ती वाक्य शरद पवारसाहेब यांच्या तोंडी दाखवून 'जय महाराष्ट्र' या वृत्तवाहिनीने बिनबुडाची व खोटी बातमी दिली.
ती बातमी सोशल मिडियावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शेअर करुन बदनामीत आणखी भर घातली आहे. या बातमीने शरद पवार यांची व पक्षाची नाहक बदनामी झाली असून हे सर्व जाणूनबुजून करण्यात आले आहे असा आरोप सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी नोटीसमध्ये केला आहे.
दरम्यान या नोटीसीनंतर जाहीर माफी आणि बदनामीकारक बातमी वाहिनीवरुन व सोशल मिडियावरुन न काढल्यास पुढील न्यायालयीन कारवाई करण्यात येईल असेही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा