नागपूर - महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान आज पार पडतंय. नागपुरातही आज मतदान आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्नी आणि आईसमवेत मतदानाचा हक्क बजावला. फडणवीसांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. फडणवीस आपल्या वृद्ध आईचा हात धरून मतदानकेंद्रात घेऊन जाताना दिसतायेत. फडणवीसांचा राजकारणातला सुसंस्कृतपणा नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणाने पाहिलाय, पण आज आईसोबतचं फडणवीसांचं संवेदनशील वर्तन पाहून एक मुलगा म्हणून राजकारणाच्या पलीकडचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला पाहायला मिळाले.
देवेंद्र फडणवीस सध्या प्रचंड व्यस्त आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्या सभा आणि भेटीगाठींचं सत्र सुरु आहे. महायुतीची महाराष्ट्रातली संपूर्ण कमानच फडणीसांच्या खांद्यावर आहे त्यामुळे फडणवीसांची प्रचारसभा व्हावी अशी महायुतीतल्या प्रत्येक उमेदवाराची इच्छा आहे. फडणवीसांच्या १०० हुन अधिक सभा होणार आहेत. या सर्व व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढूनही फडणवीस नागपूरला पोहोचले. त्यांनी मतदानकेंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही होत्या. पण सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत असलेल्या फडणवीसांच्या आई यांनी.
राजकीय जीवनात काम करत असताना राजकीय नेत्यांना घर आणि कुटुंबासाठी वेळ द्यायला मिळत नाही अशी तक्रार अनेकदा कुटुंबियांकडून होत असते. परंतु फडणवीसांनी एक वेगळं उदाहरण घालून दिल्याचं बोललं जातंय. मतदानकेंद्रात जेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या आई आल्या तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी त्यांचा हात धरला होता. आधार देत ते आईला मतदानकक्षापर्यंत घेऊन गेले. आईने मतदानाचा हक्क बजावला यातून फडणवीसांनी पक्षासाठीची निष्ठा आणि आईसोबतचं प्रेमळ नातं या दोन्ही गोष्टींचा एकत्रित दाखल दिला अशी चर्चा सर्वत्र आहे.
टिप्पणी पोस्ट करा