रावेरमध्ये बांधकाम कामगारांची फसवणूक: ओटीपीचा खेळ, पैशांचा उधळा!

 

रावेर – आता बांधकाम कामगारांना ओटीपी म्हणजे ओहोटीचं कारण ठरलं आहे! राजकीय नेतेमंडळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नव्या 'स्मार्ट' युगाचं स्वागत करत, बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी करण्याच्या नावाखाली आधार कार्ड आणि फोटो मागवून नवा खेळ सुरू केला आहे – ओटीपी चा खेळ! कामगारांना विचारलं जातं, "ओटीपी आलाय का?" आणि ओटीपी दिला की बँक खात्यातून पैसे गायब! हा खेळ सुरू होतो आणि कामगारांचे मेहनतीचे पैसे एका क्षणात हवेतच विरून जातात.


साक्षर असो वा निरक्षर, या खेळात सगळ्यांचा सहभाग आहे. गावागावांत कार्यकर्त्यांची मंडळी फिरत आहेत, आधार कार्ड आणि फोटोंचा 'कलेक्शन ड्राईव्ह' लावलेला आहे. "आम्ही तुमची नोंदणी करून देऊ," असं सांगत तेच ते 'दोन मिनिटांत' कामगारांची नोंदणी करण्याचं आश्वासन देतात, आणि हो, हा 'नोंदणीचा' खेळ ओटीपीवरच चालतो. पण कामगारांनी ओटीपी दिला, की लगेच त्यांचं खातं रिकामं होतं आणि कार्यकर्त्यांचे चेहरे मात्र फुलतात!


ही योजना बांधकाम कामगारांसाठी असली तरी राजकीय नेत्यांसाठी ती पैशांचे झरे उघडण्याचं साधन ठरली आहे. सिम कार्ड दुसऱ्याच्या नावाने खरेदी करून सायबर जगात नवनवीन कारनामे करत हे मंडळी दिसतात. कामगारांनी त्यांच्या कष्टाने जमवलेली रक्कम अशाप्रकारे जणू "फुकट" मिळाल्यासारखी वाऱ्यावर सोडली जात आहे.


साहजिकच, बांधकाम कामगारांसाठी हे 'ओटीपीचा' खेळ म्हणजे रावेर मतदारसंघातील  'नवीन मनोरंजन' आहे! पण हे मनोरंजन महागात पडू शकतं. नागरिकांनी आता या ओटीपीच्या जादूला बळी न पडता सतर्क राहणे गरजेचे आहे. अन्यथा, बांधकाम कामगारांना नोंदणीच्या नावाखाली ‘खातं’ उघडून खिशाचा भुगा होईल!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने